'तुला जिवंत सोडत नाही', चावी फेकली म्हणून पुतण्याचं संतापजनक कृत्य, नेमकं काय घडलं?

Dharashiv Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्याचदरम्यान, धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं पुरता जिल्हा हादरला आहे.

Jan 2, 2024 - 04:05
 0
'तुला जिवंत सोडत नाही', चावी फेकली म्हणून पुतण्याचं संतापजनक कृत्य, नेमकं काय घडलं?
धाराशिव : राग आणि भिक माग अशी म्हण आहे. रागावरचा ताबा सुटला की माणूस राक्षस होतो, आणि तो नको ते कृत्य करतो. अशीच एक घटना तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे घडली आहे. घराची चावी पुतण्याने चुलतीकडे मागितली. चुलतीने चावी लांबून फेकून दिली. चावी फेकल्याचा राग आल्याने ३२ वर्षीय पुतण्याने ४५ वर्षीय चुलतीला पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलून दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर दस्तगीर पिंजारी (वय ३२, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) याने त्याची चुलती मयत जैनाबी कासीम पिंजारी (वय ४५, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) दशरथ घुगे याच्या शेतात ऊस तोडत होत्या. या दरम्यान आरोपी शब्बीरने जैनाबी यांच्याकडून घराची चावी मागितली. जैनाबी यांनी चावी खाली का टाकून दिली? या कारणावरून आरोपी शब्बीर पिंजारी याने मयत चुलती जैनाबी पिंजारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. ''तुला जिवंत सोडत नाही'', असं म्हणत शब्बीरने जैनाबी यांना हाताला धरुन ओढत नेऊन पाण्याने भरलेल्या दशरथ घुगे यांच्या अणदुर शिवारातील विहिरीत ढकलून देऊन जिवे ठार मारलं. ही घटना शनिवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी ऊसतोड करणारे कामगार जैनाबी यांना वाचवण्यासाठी विहिरीच्या दिशेने धावले. परंतु जैनाबी यांनी विहिरीचा तळ गाठला होता. बघ्यांपैकी कोणी तरी नळदुर्ग पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल सांगताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आरोपी शब्बीर पिंजारी हा हैद्राबाद - सोलापूर हायवेवर जात असताना नळदुर्ग पोलिसांनी त्याला पकडले.या बाबत फिर्यादी मस्तान ईसाक शेख (वय ३६, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी काल रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम ३०२, ३२३, ५०४ भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपी शब्बीर पिंजारीला न्यायालयात हजर केल्यानंतर २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत जैनाबी यांना १ विवाहित मुलगी, २ अविवाहित मुले आहेत. तर आरोपी शब्बीर पिंजारीला ४ मुली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज देवकर हे सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow