दिवसाही भरणार हुडहुडी! राज्यातील 'या' भागात थंडीच्या लाटेचा इशारा

पुढारी ऑनलाईन : पुढील काही दिवसांत मध्य भारतातील काही भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. “५ ते ११ जानेवारी दरम्यान, रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मध्य भारतातील काही भागांमध्ये थंडीची लाट येऊ शकते. दिवसादेखील तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. यामुळे विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात थंडीची लाट … The post दिवसाही भरणार हुडहुडी! राज्यातील 'या' भागात थंडीच्या लाटेचा इशारा appeared first on पुढारी.

Jan 2, 2024 - 04:07
 0
दिवसाही भरणार हुडहुडी! राज्यातील 'या' भागात थंडीच्या लाटेचा इशारा
Cold wave

पुढारी ऑनलाईन : पुढील काही दिवसांत मध्य भारतातील काही भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. “५ ते ११ जानेवारी दरम्यान, रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मध्य भारतातील काही भागांमध्ये थंडीची लाट येऊ शकते. दिवसादेखील तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. यामुळे विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात थंडीची लाट राहील.”, अशी माहिती हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. (Weather update)

भारतीय हवामान विभाग (IMD) ने सोमवारी सांगितले की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत थंडीची तीव्र लाट येऊ शकते. वायव्य आणि पूर्व भारताच्या काही भागात पुढील तीन दिवस अति दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते हळूहळू कमी होईल.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात २ जानेवारीपर्यंत तीव्र थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जानेवारी २०२४ मध्ये उत्तर भारतातील काही भाग वगळता देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील ३-४ दिवसांत तामिळनाडू, केरळचा दक्षिण भाग आणि लक्षद्वीपच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. लक्षद्वीपमध्ये सोमवार ते गुरुवार आणि केरळमध्ये सोमवार आणि गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather update)

हे ही वाचा :

 

The post दिवसाही भरणार हुडहुडी! राज्यातील 'या' भागात थंडीच्या लाटेचा इशारा appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow