यु-डायस प्लसवर पाच लाख विद्यार्थी नाहीतच

सोलापूर : यु-डायस प्रणालीवर असलेल्या सर्व मुद्द्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी वारंवार दिल्या आहेत, मात्र अद्यापही ते काम पूर्ण झाले नाही. यु-डायस प्लसवर अद्यापही पाच लाख विद्यार्थी वर्ग करणे राहिले आहे. त्याचा मोठा परिणाम केंद्राकडून शिक्षण विभागाला मिळणार्‍या निधीवर होणार आहे. यु-डायसची माहिती तपासून ती यु-डायस प्लसमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही … The post यु-डायस प्लसवर पाच लाख विद्यार्थी नाहीतच appeared first on पुढारी.

Jan 2, 2024 - 04:07
 0
यु-डायस प्लसवर पाच लाख विद्यार्थी नाहीतच
यु-डायस प्लसवर पाच लाख विद्यार्थी नाहीतच

संतोष सिरसट

सोलापूर : यु-डायस प्रणालीवर असलेल्या सर्व मुद्द्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी वारंवार दिल्या आहेत, मात्र अद्यापही ते काम पूर्ण झाले नाही. यु-डायस प्लसवर अद्यापही पाच लाख विद्यार्थी वर्ग करणे राहिले आहे. त्याचा मोठा परिणाम केंद्राकडून शिक्षण विभागाला मिळणार्‍या निधीवर होणार आहे.

यु-डायसची माहिती तपासून ती यु-डायस प्लसमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना वारंवार दिल्या होत्या. त्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास केंद्राकडून मिळणार्‍या निधीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे काम 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

याबाबत अनेकदा शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाईन व्हीसीद्वारे सूचना दिल्या आहेत, मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. हे काम 31 डिसेंबरला पूर्ण करायचे असल्याने त्यापूर्वी 30 व 31 डिसेंबर या दोन दिवशी कार्यालयीन सुट्टी आहे, मात्र या दिवशीही कार्यालयीन कामकाज सुरू ठेऊन यु-डायस प्लसवर 100 टक्के माहिती वर्ग करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. जे या कामामध्ये हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्याचा इशाराही शिक्षण संचालकांनी दिला आहे.

त्यांच्या या इशार्‍याचा कितपत परिणाम स्थानिक पातळीवरील यंत्रणांवर होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा विषय कधी संपणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

माहिती भरणे प्रलंबित असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची स्थिती

– शासकीय – 75 हजार 103
– खासगी अनुदानित- एक लाख 55 हजार 423
– खासगी विनाअनुदानित – 38 हजार 785
– स्वयंअर्थसहायित- दोन लाख 23 हजार 440
– अनधिकृत- सहा हजार 137

यु-डायसच्या कामाची स्थिती

– प्रणालीवर नोंदलेल्या शाळा – एक लाख आठ हजार 326
– प्रणालीवर नोंदवलेले विद्यार्थी – दोन कोटी आठ लाख 76 हजार 625
– विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग केली त्या विद्यार्थ्यांची संख्या – दोन कोटी तीन लाख 77 हजार 737
– यु-डायस प्लसमध्ये माहिती वर्ग करण्याचे प्रलंबित राहिलेली विद्यार्थी संख्या- चार लाख 98 हजार 888.

The post यु-डायस प्लसवर पाच लाख विद्यार्थी नाहीतच appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow