रत्नागिरीतील निर्भय बनो सभेच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलिसांची नोटीस

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मी सभेला पोचताच स्टेजवर येण्याआधी पोलिसांनी मला नोटीस देऊन स्वागत केले, यात पोलिसांची चूक नाही त्यांना सत्ताधार्‍यांचे ऐकावे लागते, माझ्या बोलण्याची धास्ती सत्ताधार्‍यांना असल्याने प्रक्षोभक भाषण करू नये नाहीतर सीआरपीसीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी निर्भय बनो सभेच्या सुरुवातीलाच … The post रत्नागिरीतील निर्भय बनो सभेच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलिसांची नोटीस appeared first on पुढारी.

Mar 11, 2024 - 22:43
 0
रत्नागिरीतील निर्भय बनो सभेच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलिसांची नोटीस

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मी सभेला पोचताच स्टेजवर येण्याआधी पोलिसांनी मला नोटीस देऊन स्वागत केले, यात पोलिसांची चूक नाही त्यांना सत्ताधार्‍यांचे ऐकावे लागते, माझ्या बोलण्याची धास्ती सत्ताधार्‍यांना असल्याने प्रक्षोभक भाषण करू नये नाहीतर सीआरपीसीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी निर्भय बनो सभेच्या सुरुवातीलाच सांगितले.

स्टॉप साळवी जलतरण तलाववाच्या बाजूला मैदानात सोमवारी (दि. ११) ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रेया आवळे, उत्पल बाबा उपस्थित होते. अ‍ॅड. असीम सरोदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांचे नोटीस देऊन रत्नागिरी सभेच्या ठिकाणी स्वागत झाल्याचे सांगितले. मी काय बोलावे, हे आता सत्ताधारी ठरवणार आहेत. त्यामुळेच ही नोटीस देण्यात आली, यात पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे मी पोलिसांना दोष देणार नाही, सत्ताधारी सांगतील तसे त्यांना ऐकावे लागते असेही ते म्हणाले.

The post रत्नागिरीतील निर्भय बनो सभेच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलिसांची नोटीस appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow