राज्य दुग्धव्यवसाय विकास आयुक्तपदी प्रशांत मोहोड; अतिरिक्त पदभार देण्याचा शासनाचा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित बी. पवार हे 31 डिसेंबर रोजी शासन सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त (प्रशासन) प्रशांत प्रभाकरराव मोहोड यांच्याकडे 1 जानेवारीपासून सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ते मंगळवारी (दि. 2) दुग्धव्यवसाय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. मोहोड यांची 2011 मध्ये जिल्हा दुग्ध … The post राज्य दुग्धव्यवसाय विकास आयुक्तपदी प्रशांत मोहोड; अतिरिक्त पदभार देण्याचा शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.

Jan 2, 2024 - 04:02
 0
राज्य दुग्धव्यवसाय विकास आयुक्तपदी प्रशांत मोहोड; अतिरिक्त पदभार देण्याचा शासनाचा निर्णय
Prashant Mohod

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित बी. पवार हे 31 डिसेंबर रोजी शासन सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त (प्रशासन) प्रशांत प्रभाकरराव मोहोड यांच्याकडे 1 जानेवारीपासून सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ते मंगळवारी (दि. 2) दुग्धव्यवसाय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

मोहोड यांची 2011 मध्ये जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी म्हणून अमरावती, नागपूर, औरंगाबाद व पुणे येथे यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. पुणे येथे कार्यरत असताना त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात आलेल्या अनुदान योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विभागातील सहकारी संघाचे बळकटीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्राच्या सूचनेप्रमाणे योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे पार पाडली.

महामेट्रो आणि पीएमआरडीए यांना हस्तांतरित करण्यात आलेल्या जागेसंदर्भात पुनर्विकासाचे कामकाज आयुक्तांच्या आदेशान्वये पार पडले आहे. तसेच पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारीपदासह सध्या मुंबई येथील दुग्ध आयुक्तालयात उपायुक्त (प्रशासन) या पदाचादेखील कार्यभार सांभाळला आहेत.

The post राज्य दुग्धव्यवसाय विकास आयुक्तपदी प्रशांत मोहोड; अतिरिक्त पदभार देण्याचा शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow