सोलापूर : कंटेनर-कारच्या धडकेत ४ जण जागीच ठार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील परांडा- करमाळा मार्गावर पांडेजवळ (करमाळा तालुका, जि. सोलापूर) येथे आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार, तर सहाजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली. त्यात गाडीचा … The post सोलापूर : कंटेनर-कारच्या धडकेत ४ जण जागीच ठार appeared first on पुढारी.

Jan 2, 2024 - 04:13
 0
सोलापूर : कंटेनर-कारच्या धडकेत ४ जण जागीच ठार
कंटेनर-कारच्या धडकेत ४ जण जागीच ठार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील परांडा- करमाळा मार्गावर पांडेजवळ (करमाळा तालुका, जि. सोलापूर) येथे आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार, तर सहाजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडेजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. यामध्ये नवरदेव- नवरी असल्याचेही सांगितले जात आहे. अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्येमी दीपक हुनशामठ (३८ रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशाल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. अपघातग्रस्तांवर डॉ. गजानन गुंजकर व डॉ. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. हा अपघात पांडे येथील फिसरेच्या बाजूला असलेल्या वळणावर झाला आहे.

हेही वाचा : 

The post सोलापूर : कंटेनर-कारच्या धडकेत ४ जण जागीच ठार appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow