सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद

बेलभंडारे पाकणी: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणाविरोधात पाकणी येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लि. आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. येथील सर्व टँकर चालक, मालकांनी आज (दि.१) बंद पाळून आंदोलन केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केल्याने इंधनाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास आणि तो पळून … The post सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद appeared first on पुढारी.

Jan 2, 2024 - 04:07
 0
सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद
पाकणी

बेलभंडारे पाकणी: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणाविरोधात पाकणी येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लि. आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. येथील सर्व टँकर चालक, मालकांनी आज (दि.१) बंद पाळून आंदोलन केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केल्याने इंधनाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास आणि तो पळून गेल्यास ७ लाख दंड व १० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर अपघात झालेल्या व्यक्तीला अपघात करणा-या वाहन चालक, क्लिनिअर यांनी रूग्णालयामध्ये दाखल केल्यास दंड आणि शिक्षा कमी होऊ शकते. हा नियम जाचक असल्याने टँकर चालक, मालकांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळून निषेध केला.

या बंद आंदोलनामुळे पाकणी ऑईल डेपोमधून सोलापूरसह इंधन पुरवठा होणा-या उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जत आदी ठिकाणी इंधन पुरवठा झाला. त्यामुळे येथे इंधन टंचाई भासण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

The post सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow