सोलापूर: मार्डीजवळील पुलाखाली महिलेचा सडलेला मृतदेह आढळला

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी- व्हनसळ रस्त्यावरील मार्डीजवळील पुलाच्या पाईपमध्ये अंदाजे ३५ ते ४० वयाच्या अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (दि.२५) दुपारी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Solapur News याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मार्डी- व्होनसळ रस्त्यावर मार्डी जवळील इंगळे ओढ्यावरील पुलाच्या  पाईपमध्ये … The post सोलापूर: मार्डीजवळील पुलाखाली महिलेचा सडलेला मृतदेह आढळला appeared first on पुढारी.

Jan 2, 2024 - 04:13
 0
सोलापूर: मार्डीजवळील पुलाखाली महिलेचा सडलेला मृतदेह आढळला
solapur

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी- व्हनसळ रस्त्यावरील मार्डीजवळील पुलाच्या पाईपमध्ये अंदाजे ३५ ते ४० वयाच्या अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (दि.२५) दुपारी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Solapur News

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मार्डी- व्होनसळ रस्त्यावर मार्डी जवळील इंगळे ओढ्यावरील पुलाच्या  पाईपमध्ये अंदाजे ३५ ते ४० वयातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत जनावरे राखणाऱ्या व्यक्तींना आढळून आला. परिसरात मृतदेहाची दुर्गंधी येत होती. मार्डी पोलीस पाटील यांनी याची माहिती पोलिसांना कळविले. उत्तर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. Solapur News

गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिलेच्या उजव्या हातावर स्वामी समर्थांचे चित्र व स्वामी असे गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

The post सोलापूर: मार्डीजवळील पुलाखाली महिलेचा सडलेला मृतदेह आढळला appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow