सोलापूर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 'तडजोड' योजनेतून ९९ शेतकरी कर्जमुक्त

सोलापूर :  राज्यात १७ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या व 321 शाखा विस्तार असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला 28 फेब्रुवारीला दहा वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने बँकेचे अध्यक्ष विजयकुमार वर्मा यांनी थकीत शेतकरी कर्जमुक्तीसाठी विशेष योजना आखली आहे. या योजनेद्वारे आत्तापर्यंत ९९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.  बँकेच्या प्रशासनाने विको सद्भावना कृषी कर्ज तडजोड, संजीवनी कर्ज …

सोलापूर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 'तडजोड' योजनेतून ९९ शेतकरी कर्जमुक्त

सोलापूर वृत्तसेवा :  राज्यात १७ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या व 321 शाखा विस्तार असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला 28 फेब्रुवारीला दहा वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने बँकेचे अध्यक्ष विजयकुमार वर्मा यांनी थकीत शेतकरी कर्जमुक्तीसाठी विशेष योजना आखली आहे. या योजनेद्वारे आत्तापर्यंत ९९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.

 बँकेच्या प्रशासनाने विको सद्भावना कृषी कर्ज तडजोड, संजीवनी कर्ज तडजोड योजना जाहीर केली आहे. याचा लाभ देण्यासाठी बॅकेच्या वतीने एक रकमी कर्ज तडजोड मेळावे घेण्यात येत आहेत. पंढरपूर येथे १० शाखांच्या थकीत १०५ कर्जदारांनी सहभाग घेतला. यावेळी सोलापूर क्षेत्राचे रिजनल मॅनेजर रमेश खाडे व त्यांच्या दहा शाखाधिकारी टीमने 53 थकीत शेतकरी कर्जदारांच्या 1 कोटी 80 लाखाच्या तडजोड प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये थकीत खातेदारांना व शेतकरी कर्जदारांना मोठ्या प्रमाणात सवलत देऊन कर्जमुक्ती सद्भावना योजनेचा लाभ मिळवून दिला.

सोलापूर कार्यालयातील मेळाव्यात ४६ कर्जदारांनी सहभाग नोंदवला. आणि त्या दिवशी सुमारे ८३ लाखांच्या थकीत कर्जदारांना जागेवरच तडजोड योजनेअंतर्गत मंजुरी दिली गेली. या एक रकमी तडजोड योजनांची मुदत ३१ मार्चपर्यंत आह