किणी ते सुलतानपूर रस्त्यावरील बोरी नदीवरील पुलासाठी 13 कोटी रुपये मंजूर

किणी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा तसेच शेती आणि दळण वळण या दोन्हीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 13 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

किणी ते सुलतानपूर रस्त्यावरील बोरी नदीवरील पुलासाठी 13 कोटी रुपये मंजूर

किणी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा तसेच शेती आणि दळण वळण या दोन्हीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 13 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. किणी ते सुलतानपूर रस्त्यावरील किणी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरी नदीवरील पुलाची अतिशय आवश्यकता या भागातील नागरिकासाठी होती.

किणी परिसरातील बहुतांश शेती ही बोरी नदीच्या पलीकडे सुलतानपूर शिवारात आहे. पावसाळ्यात सहा महिने बोरी नदीला पाणी असल्याने पलीकडचे आपल्या शेतीला जाण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागत असे. दीड किलोमीटरच्या अंतर पार करून जाण्यासाठी त्यांना पर्यायी पूल नसल्याने किणी परिसरातील नागरिकांना सुलतानपूर शिवारातील शेतीत जाण्यासाठी चुंगी ते हन्नूर ते सुलतानपूर असा 16 km चा प्रवास त्यांना करावा लागत असे. त्यामुळे प्रत्येकाला

एका फेरीला 32 किलोमीटर आंतर ज्यादा जावे लागत होते.याशिवाय किणीहुन शेतीसाठी बोरीनदीपलीकडे मंजूर घेऊन जाणे खूप त्रासदायक ठरत होते.यासाठी किणी परिसरातील नागरिक या बोरी नदीवरील पुलाचे बांधकाम होऊन मिळण्याबाबत प्रतीक्षेत होते. अक्कलकोटच्या उत्तर भागातील सर्वात महत्त्वाचा हा पूल आहे. या भागातील नागरिकांनी गेल्या पंचवीस वर्षांपर्यंत प्रलंबित प्रश्न न सुटल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता आणि हे सदर पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याला त्वरित प्रतिसाद देत