सोलापूर जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.१९% मतदान

सोलापूर जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यत्व पदांसाठी रविवारी त्या त्या ठिकाणी मतदान घेण्यात आले. ८१.१९% इतके मतदान झाले. सर्वात अधिक मतदान पंढरपूर तालुक्यात (८७.०३%) झाले. निवडणुकीत ३ लाख ८३ हजार १३ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

दरम्यान, सर्वच आघाड्यांनी विजयाचा दावा केला असला तरी विजयी गुलाल कोण उधळणार ? हे मात्र मंगळवारी स्पष्ट होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यास व जल्लोष करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

एकूण ६६८ केंद्रांवर मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींपैकी १५ सरपंच व ३२९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १७७ ग्रामपंचायती व १४१७ सदस्यांसाठी ६६७ मतदान केंद्रांवर रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.

ग्रामपंचायती निवडणुकीसाठी करमाळा ८३, माढा ३२, बार्शी ५७, उत्तर सोलापूर ५७, मोहोळ ३०, पंढरपूर ३५, माळशिरस १५९, सांगोला २१, मंगळवेढा ४९, दक्षिण सोलापूर ७१, अक्कलकोट ७३ याप्रमाणे एकूण ६६८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.