धावपटू निकिता राऊतला मोठा धक्का, डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह, नाडाने घातली तीन वर्षांची बंदी

Nikita Raut tested positive in doping : डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊत हिच्यावर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने ३ वर्षांसाठी बंदी घातली आहे.

धावपटू निकिता राऊतला मोठा धक्का, डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह, नाडाने घातली तीन वर्षांची बंदी

नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने (नाडा) रविवारी ही कारवाई केली. त्याची माहिती अ‍ॅथलेटिक इंटिग्रिटी युनिटला (AIU) देण्यात आली आहे. निकिता ही शहरातील तिसरी खेळाडू आहे जिच्यावर डोपिंगविरोधी कारवाई करण्यात आली आहे.नुकतेच NADA ने धावपटूच्या लघवीचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली. निकिताने 19-Norandrosterone (प्रतिबंधित अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड) घेतल्याचे तपासणीत आढळून आले. माहितीनुसार, या पदार्थावर इंटरनॅशनल अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने ३० वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा पदार्थ प्रामुख्याने स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नाडाने रविवारी निकितावर तीन वर्षांची बंदी घातली.निकिताने गेल्या वर्षी बेंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये त्याने ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. प्रतिबंधित द्रवांसंदर्भातील नियमंभगासाठी तिला ही शिक्षा करण्यात आल्याचे 'एआययू'ने म्हंटले आहे. या प्रकरणानंतर डोपिंग चाचणी चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, ही चाचणी कशी होते, चाचणीचे स्वरूप काय असते, यावर टाकलेला हा प्रकाशझोत.डोपिंग म्हणजे काय?कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्यात असलेली शारीरिक क्षमता जलदगतीने वाढविण्यासाठी खेळाडूने उत्तेजक द्रव घेतले असेल तर ते तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचणीला डोपिंग चाचणी असे म्हणतात. क्रीडा क्षेत्रात स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग केले जाते. कोणत्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षण शिबिरात परिक्षकांना संशय आल्यास डोपिंग टेस्ट घेतली जाते. ही चाचणी विश्व डोपिंग संस्था आणि राष्ट्रीय डोपिंग संस्था यांच्याकडून घेतली जाते.'वाडा' व 'नाडा' काय आहेत?उत्तेजक द्रव चाचणी करण्याची जबाबदारी वाडा (जागतिक उत्तेजक द्रवप्रतिबंधक संस्था) व नाडा (राष्ट्रीय उत्तेजक द्रवप्रतिबंधक संस्था) या दोन संस्थावर आहे. जागतिक स्तरावर उत्तेजक द्रवपदार्थ सेवन करण्यास प्रतिबंध लावण्यासाठी १९९९ मध्ये 'वाडा'ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक देशात 'नाडा'ची स्थापना झाली. या संस्थांतर्फे डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंवर २ वर्षांच्या शिक्षेपासून आजीवन बंदी लादण्यापर्यंत कारवाई करण्याचे अधिकार आहेत.डोपिंग टेस्ट कशी होते?खेळाडूचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासण्यासाठी घेतले जातात. हे नमुने दोन प्रकारे घेतले जातात- ए व बी. ते पंचांसमोर व खेळाडूंसमोरच सीलबंद केले जातात. 'नाडा' व 'वाडा' यांच्याकडून हे नमुने घेण्यात येतात. घेतलेले नमुने त्यांच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेले जातात. यातील 'ए' प्रकारच्या चाचणीत प्रथमच दोषी आढळल्यास तात्पुरत्या निलंबनाची कारवाई होते. खेळाडू 'बी' चाचणीसाठी अँटिडोपिंग पॅनलकडे अपील करू शकतो. त्यानंतर नमुने पुन्हा तपासले जातात. त्यातही पॉझिटिव आढळल्यास खेळाडूवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.चाचणी पॉझिटिव आढळल्यास...- स्पर्धेपुरती बंदीची कारवाई होऊ शकते- निर्णयावर खेळाडूला आपले म्हणणे सादर करता येते- ठराविक कालावधीसाठी बंदी घालण्यात येते- दोषी आढळल्यास मिळालेली सर्व पदके काढून घेतली जातात- खेळाडूवर कायमच्या बंदीची कारवाई होऊ शकते.काय आहेत डोपिंगचे नियम?- खेळाडूने कोणतेही उत्तेजक द्रव घेऊन खेळात सहभागी होऊ नये- प्रतिबंध केलेल्या औषधांचे सेवन करू नये. तसे आढळल्यास कारवाई होऊ शकते.- डोपिंग समितीने चाचणीसाठी बोलावल्यास त्यांना नकार दिल्यास अशा खेळाडूवर कारवाई होऊ शकते.- अधिकाऱ्यांनी वेळोवेळी औषधांच्या बाबतीत केलेल्या सुधारणा न पाळल्यास कारवाई होऊ शकते.- डोपिंग समिती चाचणीला बोलावल्यावर हजर न झाल्यास कारवाई होऊ शकते.