बचत खात्यात ‘किमान शिल्लक’ राखता येत नाही? काळजी नको, एका ट्रिकने दूर होईल टेन्शन; जाणून घ्या

बँकेच्या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक राखणे आवश्यक असते. असे न केल्यास खातेधारकाला दोन हजार ते १० हजारपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

Sep 26, 2023 - 17:18
Sep 26, 2023 - 17:21
 0
बचत खात्यात ‘किमान शिल्लक’ राखता येत नाही? काळजी नको, एका ट्रिकने दूर होईल टेन्शन; जाणून घ्या

नवी दिल्ली : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. बँक खाती दोन प्रकारची असतात - एक चालू खाते आणि दुसरे बचत खाते. बरेच लोक विशेषतः नोकरदार लोक बचत खात्यात किमान शिल्लक ठेवत नाहीत, परंतु बँक खात्यात किमान शिल्लक राखणे फार महत्वाचे असते. बँकेत बचत खाते असणे ही अतिशय सामान्य गोष्ट असून जर एखाद्याला नियमित उत्पन्न मिळत असेल तर त्याचे पगार खाते उघडले जाते, जे बचत खात्यासारखे असते. याशिवाय ग्राहक स्वतःचे बचत खाते देखील उघडू शकतात. बचत खात्यावर काही प्रमाणात व्याजही दिले जाते तथापि, बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. बचत खात्यात किमान शिल्लक प्रत्येक बँकेच्या बचत खात्यात किमान शिल्लक वेगवेगळी असू शकते. काही बँकेत तुम्ही एक हजार रुपये तर काही बँकांमध्ये १० हजार रुपयेही किमान शिल्लक बंधनकारक आहे. तुम्ही शहरात रहात आहात की ग्रामीण भागात यावर बँकेचा नियम अवलंबून असतो. तथापि अनेकांना बचत खात्यात किमान शिल्लक राखणे कठीण जाते, परिणामी त्यांना दंड आकारला जातो.बचत खाते खूप सुरक्षित असले तरी त्याची एक कमतरता म्हणजे त्यात पैसे ठेवण्यासाठी तुम्हाला किमान शिल्लक राखावी लागेल आणि जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

किती दंड भरावा लागेल?

यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे शुल्क देखील असून हे दोन हजार ते १० हजार रुपयांपर्यंत असू शकते. दंड आकारणे ही ग्राहकांसाठी वेगळी डोकेदुखी ठरते. ग्राहकांना बचत खात्यात किमान शिल्लक राखता आले नाही तर त्यांना अतिरिक्त पेमेंट (दंड) करण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या समस्येशी झगडत असाल तर तुम्ही या समस्येतून एक प्रकारे सुटका होऊ शकते. बचत खात्यात किमान शिल्लक नसेल तर...जर तुम्हालाही वरील समस्येला सामोरे जावे लागत असेल तर सर्व प्रथम आपले बँक खाते बंद करा. जर तुम्हाला किमान शिल्लक राखू शकत नसाल तर बचत खाते बंद करावे. लक्षात ठेवा की त्यावेळी तुमच्या खात्यात ऋण शिल्लक असू शकत नाही. यानंतर तुम्ही शून्य शिल्लक असलेले नवीन खाते सुरू करा. शून्य शिल्लक खाती म्हणजे ज्यात किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला त्या बँकेत शून्य शिल्लक खाते मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत सुविधेचा फायदा घेऊ शकता. दरम्यान, लक्षात ठेवा की या खात्यांमध्ये व्यवहार शुल्क जास्त असू शकते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow