शेतातून दुर्गंधी यायला लागली; शोध घेताच संशयित गोणी सापडली, उघडताच नागरिकांना बसला धक्का, काय घडलं?

नाशिकमध्ये गोणीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Sep 26, 2023 - 17:18
Sep 26, 2023 - 17:19
 0
शेतातून दुर्गंधी यायला लागली; शोध घेताच संशयित गोणी सापडली, उघडताच नागरिकांना बसला धक्का, काय घडलं?

नाशिक: शहरातील दिंडोरी रोडवर असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील रस्त्याच्या लगत एका आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेचा तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने अनेक तर्क - वितर्क लावले जात आहेत. मात्र पोलिसांकडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. आज सकाळी नाशिकच्या दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी चौकशी केली त्यावेळी रस्त्याच्या कडेला एका गोणीत गवतामध्ये हा संशयितरित्या मृतदेह आढळून आला. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करत घटनेच्या तपासात सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा, फॉरेन्सिक लॅब, शववाहिका घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना हत्या झाल्याचा अंदाज आहे. मात्र महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आल्याने महिलेची हत्या आहे की आणखी काही या मागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे महिलेच्या मृतदेहामागील गूढ समोर आलेले नाही. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र हा मृतदेह कोणत्या महिलेचा आहे याची देखील ओळख पटू शकलेली नाही. या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी मृतदेह आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कांदे बटाटे भरण्याच्या जाळीदार गोणी सदर मृतदेह टाकण्यात आला होता तसेच त्या ठिकाणी काही कपडे देखील पोलिसांना मिळून आले आहे. तसेच मृतदेहावर अळ्या पडण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे मृतदेह हा कुजण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow