ATM’ मधून पैसे लंपास करणारे जेरबंद

हिताची पेमेंट्‌स सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या एटीएममधून तब्बल १० लाख रुपये लंपास करणाऱ्या तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. हरियानातून चारचाकी घेऊन तिघेजण ऑक्टोबरमध्ये शहरात आले होते. त्यासंदर्भातील गुन्हे आता दाखल झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. एसटी स्टॅंड परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्या तिघांनीच तो प्रकार केल्याची बाब आता पोलिस तपासात समोर आली आहे

फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अवि लॉजजवळील एटीएममध्ये सात डेबिट कार्ड वापरून त्या तिघांनी एक लाख ९९ हजार रुपये लंपास केले होते. ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांत तेथील एटीएममधून पैसे काढले. तर जुने विडी घरकुल परिसरातील हिरा मोती टॉवर (सोनिया नगर), योगेश्वर नगर (शिंदे शाळेजवळ) व हैदराबाद रोडच्या विरुद्ध दिशेला युनियन एटीएमजवळील हिताची कंपनीच्या एटीएममधून चोरट्यांनी १५ ऑक्टोबर रोजी तब्बल पाच लाख ९९ हजार २०० रुपये लंपास केले. फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केलेले तेच तिघे या गुन्ह्यात संशयित आहेत.

जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका एटीएममधील काही रोकड चोरीला गेल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ते तिघेही पांढऱ्या चारचाकीतून रविवारी (ता. १८) रात्री साडेआठच्या सुमारास संशयितरीत्या फिरत होते. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्यांच्या पथकासह त्या तिघांवर वॉच ठेवला. त्याचवेळी त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकालाही मदतीला बोलावले. त्या सर्वांनी मिळून त्यांना थांबवले व प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तेव्हा संशय बळावला आणि पहाटे दीडच्या सुमारास त्यांना अटक केली. तिघेही ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.