बावनकुळेंच्या फॉर्म्युलामुळे युतीत ठिणगी, शिंदे गटाच्या आमदारकडून वेगळा विचार करण्याचा इशारा
BJP Shinde camp Vidhansabha seat sharing formula | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० तर शिंदे गट ४८ जागांवर निवडणूक लढवेल, असे म्हटले होते.

रत्नागिरी: आजची सभा झाली आता अधिवेशन संपल्यावर मग कळेल काय होतेय आणि काय नाही ते कोण कोण आमदार येतात ते तुम्हाला लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जेष्ठ नेते आमदार यांनी दिली आहे. खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला दाखल झाल्यानंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांजवळ संवाद साधला.चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुकून ते विधान केले आहे. पण जर ते या विषयावर ठाम असतील तर मग आम्ही विचार करू, असा सूचक ईशारा गोगावले यांनी दिला आहे.आमचं ऑपरेशन चालू आहे, वेळ आली की जाहीर करू. लवकरच त्याचा गौप्यस्फोट केला जाईल, असे भरत गोगावले यांनी सांगितले. संजय राऊत यांना जर का आम्ही मतं दिली नसती तर राऊत यांची आज काय अवस्था असती? आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरा मान वाकडी केली असती तर आज आज संजय राऊत ना घर का घाट का अशी परिस्थिती झाली असती. त्यामुळे त्यांनी संजय राऊत यांनी तोंड सांभाळून बोलावं, असा थेट इशाराच भरत गोगावले यांनी दिला आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी शिवसेना भाजपा युतीच्या जागा वाटपाबाबत केलेल्या विधानसंदर्भात बोलताना भरत गोगावले यांनी सांगितले की, त्यांचा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता त्यांनी नंतर सारवासारव केली हे तुम्ही पाहिलं त्यांनी दुरुस्ती केली आहे हे आम्ही समजून घेऊ. पण ते जर का ते त्याच विषयावरती ठाम असतील तर आम्हीही विचार करू, असा इशाराही भरत गोगावले यांनी दिला.