बापरे! पत्नीचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढले, न्यूनगंडातून पतीने केले ते भयंकरच...
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३७ वर्षीय व्यावसायिकाने आपल्या पत्नीचा दोन मुलांसमोरच गळा दाबून खून केला. इन्स्टाग्राम ॲपवर पत्नीच्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स वाढत होते. यामुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडातून पत्नीचा खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिली आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

पत्नीचे ‘इन्स्टा’ फॉलोअर्स वाढल्याने नात्यात तणाव
या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी कुमार यादव यांनी सांगितले की, “पती हा टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीचा मालक होता, तर त्याची पत्नी गृहिणी होती. हे जोडपे लखनऊच्या पॅरा लोकलमध्ये त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीसह आणि पाच वर्षांच्या मुलीसह राहत होते. मागील काही दिवसांमध्ये पत्नीचे इन्स्टाग्राम ॲपवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स वाढले होते.यामुळे मागील काही दिवसांपासून पती हा मानसिक तणावात होता. त्याच्या न्यूनगंडात वाढ झाली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीने त्याला आपल्याविविध खात्यांवर ब्लॉक केले होते. पत्नी आपल्या काही सोशल मीडिया प्रशंसकांना भेटत असल्याचा पतीला संशय होता. या संशायतून दोघांच्या नात्यात तणाव वाढला.”
Lucknow crime : मुलांसमोरच केला पत्नीचा गळा दाबून खून
रविवार[ ( दि.१३) सकाळी पतीने रायबरेलीला जायचे असल्याचे सांगत पत्नी आणि दोन मुलांसह प्रवासाला सुरुवात केली. रायबरेलीला जाण्याऐवजी ते पूर्वांचल एक्सप्रेसवेकडे वळले. पहाटे पाचच्या सुमारास पतीसुलतानपूरच्या मुजेश चौरस्त्यावर थांबला. येथे त्याचा पत्नीशी जोरदार वाद झाला. रागाच्या भरात त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्याने आपल्या मुलांसमोर हे कृत्य केले. त्यानंतर आरोपीने स्वत:ला एसयूव्हीमध्ये कोंडून घेतले. पोलिसांना संशयास्पदरीत्या पार्क केलेली एसयुव्ही दिसली. त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याला सूचना दिली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.