नागपूर : अंबाझरी तलावाची जैवविविधता धोक्यात

नागपूर वृत्तसेवा : अंबाझरी तलावात गेल्या काही दिवसात इकोपीया प्रकारातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे शहराचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाची जैवविविधता धोक्यात आली आहे. आय लव्ह नागपूर असे फलक असलेल्या ठिकाणी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या नागपूरकरांनी देखील याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे.

नागपूर : अंबाझरी तलावाची जैवविविधता धोक्यात

नागपूर वृत्तसेवा : अंबाझरी तलावात गेल्या काही दिवसात इकोपीया प्रकारातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे शहराचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाची जैवविविधता धोक्यात आली आहे.

आय लव्ह नागपूर असे फलक असलेल्या ठिकाणी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या नागपूरकरांनी देखील याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे. स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात सेल्फीसाठी होणाऱ्या गर्दीतही पर्यावरणाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असल्याचे निदर्शनास आले.

अंबाझरीमध्ये पोहणाऱ्या व परिसरात भ्रमंती करणाऱ्या नागरिकांनी ही धोकादायक जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. तलावामध्ये जलपर्णी झपाट्याने वाढत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यास लवकरच ही वनस्पती पूर्ण तलाव व्यापून टाकेल असा धोका नागरिकांना वाटत आहे. विशेष म्हणजे ही जलपर्णी गेल्या दोन वर्षापासून अंबाझरी तलावामध्ये आपले जाळे पसरवत असताना याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही.

महानगरपालिकेच्या वतीने हे काम तातडीने करणे जरूरी आहे अन्यथा लवकरच अंबाझरी तलाव दिसेनासा झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत शहरच्या दृष्टीने महत्वाच्या अशा एका प्रेक्षणीय तलावाचे संरक्षण करावे अशी मागणी केली आहे.