सोलापूर : विद्या परिषदेच्या बैठकीत कॅरीऑनचा निर्णय मंजूर! सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत सर्व विद्या शाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन योजनेअंतर्गत लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली. सोमवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली.

Sep 26, 2023 - 17:01
Sep 26, 2023 - 17:04
 0
सोलापूर : विद्या परिषदेच्या बैठकीत कॅरीऑनचा निर्णय मंजूर! सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत सर्व विद्या शाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन योजनेअंतर्गत लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली. सोमवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले. बैठकीस विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत विविध विद्यार्थी आणि संघटनांच्या मागणीनुसार सर्व विद्या शाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन योजनेअंतर्गत लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात नियमावली तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. याचबरोबर पीएचडी प्रवेशासाठी पेट -९ ची प्रकिया सुरू करण्यासाठीही समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यांमध्ये काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढीव प्रवेश देण्यात आली आहे. नियमानुसार दहा टक्के वाढीव प्रवेश देण्यास मान्यता देण्यात येते. मात्र काही महाविद्यालयांमध्ये 110% वाढीव प्रवेश देण्यात आली आहे. अशा महाविद्यालयांतील साधन सामुग्री, पायभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow