सोलापूर शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी (दि.७) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने आज सोलापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच शुक्रवारी (दि.७) शहर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सोलापूर शहर व जिल्ह्यात कमालीची घट झाली होती. गेल्या …

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी (दि.७) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने आज सोलापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच शुक्रवारी (दि.७) शहर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सोलापूर शहर व जिल्ह्यात कमालीची घट झाली होती. गेल्या चार-पाच दिवसापासून सातत्याने वाढत चाललेला तापमानाचा पारा चाळीस अंशावरून थेट 28 अंशापर्यंत घसरला होता. (Weather Update)
Weather Update : खबरदारी घ्यावी
शुक्रवारी दिवसभर सोलापूर शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या वातावरणाचा विपरीत परिणाम शहर जिल्ह्यातील फळबागांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यामध्ये काही ठिकाणी आंबा, पेरू, द्राक्ष, पपई, डाळिंब या पिकासह रब्बीची काही पिकं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर शहर मोहोळ सह अनेक तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याची नोंद आहे.
तसेच हवामान खात्याने जारी केलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी वादळी वारे आणि वीज कडाडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने केले आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस असेच राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनी ही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.