कॉंग्रेस प्रवक्त्याकडून भुजबळ यांना प्रत्युत्तर

सोलापूर वृत्तसेवा : ब्राह्मण समाजातील अनेक मुलांची नावे संभाजी, शिवाजी आहेत. ब्राह्मणांचा द्वेष करायचा आणि ब्राह्मण-बहुजन वाद पेटवून राजकारणात स्वतःच अस्तित्व टिकून ठेवायचं असा छगन भुजबळ यांचा धंदा आहे, ते कमी बुद्धीचे माणूस आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.

ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते, त्याला उत्तर देताना प्रा. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांना ब्राह्मणांचा एवढा द्वेष होता तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून का बसलात, देवेंद्रजी आपण ब्राह्मण आहात मी तुमच्या शेजारी बसणार नाही, असे बोलालया त्यांची हिंमत होणार का, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.

छगन भुजबळ चुकीचा इतिहास सांगत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या ’काव्य फुले’ या कवितासंग्रहात शाळेला सरस्वतीचा दरबार असे वर्णन केले आहे. फुले कुटुंबीयांचं साहित्य नाकारण्याचं पाप छगन भुजबळ करत आहेत, असेही ते म्हणाले. छगन भुजबळांचे मंत्रीपद काढून घेण्याबाबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही प्रा. कुलकर्णी शेवटी म्हणाले.