सोलापूर : आसरा चौकात तरुणाचा दिवसाढवळ्या खून

सोलापूर :  शहराचा गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या आसरा चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. विजापूर नाका पोलिसांनी मारेकर्‍यास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अजित कोलार (30) असे मयत तरुणाचे नाव असून, तो धाराशिव … The post सोलापूर : आसरा चौकात तरुणाचा दिवसाढवळ्या खून appeared first on पुढारी.

सोलापूर : आसरा चौकात तरुणाचा दिवसाढवळ्या खून

सोलापूर:  शहराचा गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या आसरा चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. विजापूर नाका पोलिसांनी मारेकर्‍यास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अजित कोलार (30) असे मयत तरुणाचे नाव असून, तो धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा रहिवासी आहे. सध्या सोलापूरच्या कर्णिकनगरात राहतो. प्रभाकर माने (रा. कल्याण नगर, जुळे सोलापूर) असे मारेकर्‍याचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिवस असो वा रात्र नेहमी गर्दीचे ठिकाण म्हणून आसरा चौकाची ओळख आहे. या चौकातील एका इमारतीच्या गाळ्यात असलेल्या श्रध्दा व्हिडीओ गेम सेंटरमध्ये दुपारी दोनच्या सुमारास अजित कोलार याच्याशी प्रभाकर मानेचा वाद झाला. वादावादीत प्रभाकर याने अजितवर चाकूने सपासप वार केले. यामुळे अजित याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध झाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्यासह विजापूर नाका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत ही घटना नेमकी कोणत्या कारणावरून घडली याबाबत पोलिस चौकशी करीत होते. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.