फिफ्टी, फिफ्टी, फिफ्टी… ईशानचा धमाका! ‘या’ दिग्गजांच्या खास क्लबमध्ये दाखल
Ishan Kishan Half Centuries Hat Trick : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे (WI vs IND ODI Series). युवा फलंदाज ईशान किशनसाठी (Ishan Kishan) ही मालिका खूपच खास राहिली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली.

Ishan Kishan Half Centuries Hat Trick : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे (WI vs IND ODI Series). युवा फलंदाज ईशान किशनसाठी (Ishan Kishan) ही मालिका खूपच खास राहिली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. या कामगिरीच्या जोरावर तो एकदिवसीय मालिकेतील 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतके झळकावणाऱ्या टीम इंडियाच्या अनुभवी फलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
– Fifty in 2nd Test.
– Fifty in 1st ODI.
– Fifty in 2nd ODI.
– Fifty in 3rd ODI.Fourth consecutive fifty for Ishan Kishan in this tour, he has been in remarkable touch. pic.twitter.com/SEY8fzNmxp
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2023
3 वनडेत 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इशान (Ishan Kishan) हा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरक, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, श्रेयस अय्यर यांनी अशी कामगिरी केली आहे. (Ishan Kishan Half Centuries Hat Trick)
ODI मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज
कृष्णमाचारी श्रीकांत : 1982 विरुद्ध श्रीलंका
दिलीप वेंगसरकर : 1985 विरुद्ध श्रीलंका
मोहम्मद अझरुद्दीन : 1993 विरुद्ध श्रीलंका
एमएस धोनी : 2019 विरुद्ध ऑस्ट्रेलिया
श्रेयस अय्यर : 2020 विरुद्ध न्यूझीलंड
इशान किशन : 2023 विरुद्ध वेस्ट इंडिज
Ishan Kishan is now part of an elite list ????????#WIvIND #CricketTwitter pic.twitter.com/cNQeGM6dcJ
— Sportskeeda (@Sportskeeda) August 1, 2023
3️⃣ ODIs
3️⃣ Fifty-plus scores
1️⃣8️⃣4️⃣ RunsIshan Kishan was impressive & consistent with the bat and won the Player of the Series award ???? ????#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/cXnTGCb73t
— BCCI (@BCCI) August 1, 2023
विंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Team India vs WI ODI) ईशान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आणि एकूण 184 धावा केल्या. या दमदार कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले आहे. किशनने 61.33 च्या सरासरीने आणि 111.51 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने पहिल्या सामन्यात 46 चेंडूत 52, दुसऱ्या सामन्यात 55 चेंडूत 55 आणि तिसऱ्या सामन्यात 64 चेंडूत 77 धावा फटकावल्या. (Ishan Kishan Half Centuries Hat Trick)