हरियाणा हिंसाचारप्रकरणी 176 जणांवर अटकेची कारवाई

वृत्तसंस्था : हरियाणातील हिंदू आणि मुस्लिम समुदायातील हिंसाचारप्रकरणी 176 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तणाव निवळत असल्याने काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवेवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून अफवा पसरविणार्‍यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. हरियाणातील नूह येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात सहा जणांचा बळी गेला आहे. दोन्ही … The post हरियाणा हिंसाचारप्रकरणी 176 जणांवर अटकेची कारवाई appeared first on पुढारी.

हरियाणा हिंसाचारप्रकरणी 176 जणांवर अटकेची कारवाई

वृत्तसंस्था : हरियाणातील हिंदू आणि मुस्लिम समुदायातील हिंसाचारप्रकरणी 176 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तणाव निवळत असल्याने काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवेवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून अफवा पसरविणार्‍यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली.

हरियाणातील नूह येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात सहा जणांचा बळी गेला आहे. दोन्ही समुदायातील ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. नूह, फरिदाबाद, पलवाल आणि सोना जिल्ह्यांतील इंटरनेट सेवेवरील बंदी कायम ठेवली आहे. सोमवारपासून हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या अन्य जिल्ह्यांतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने त्या ठिकाणी इंटरनेटवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी दोन्ही समुदायांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले होते. भिवनी हत्याकांडातील आरोपी मोनू मनेसर मिरवणुकीत सहभागी झाला असल्याची अफवा पसरल्यानंतर दंगल उसळली होती.

मंदिराबाहेर गोळीबार तर दुसरीकडे मशीद पेटविली

नलहरेश्वर मंदिराच्या बाहेर बुधवारी गोळीबाराची घटना घडली. भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गुरुग्राम येथील एका मशिदीला आग लावण्याची घटनाही आज उघडकीस आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळल्याची माहिती सूत्रांनी दिली.