सोलापूर : घरी सोडतो असे सांगून तरुणीवर हॉटेलमध्ये नेवून जबरदस्ती
सोलापूर वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यामधील एका भागात दवाखान्यात गेलेल्या महिलेला घरी सोडतो असे सांगून रिक्षातून हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्ती केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी आपल्या वहिनी सोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती. या तरुणीच्या पाठीमागून आलेल्या ना आरोपी दवाखान्यात तू येथे कशाला आली आहेस असे विचारत तिला घरी सोडतो, असे सांगून त्याने तिला रिक्षामध्ये बसवून एका मित्राकडे नेले. तेथून त्याने तिला एका मंदिरात नेऊन तिच्या गळ्यात एक पिवळा दोरा बांधला. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेले. त्याने पुन्हा त्या महिलेला कोर्टाजवळील एका ऑफिसमध्ये नेऊन तिचा फोटो लावलेल्या एका कागदावर धमकावून सह्या करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने आता आपण दोघे पती-पत्नी झालो आहे, असे सांगून तिच्यावर हॉटेलमध्ये जबरदस्ती केली. दरम्यान त्याने तिला कोणत्याही नातेवाईकांना फोन लावू दिला नाही. तसेच या तरुणीने आरोपीला विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडित महिलेच्या भावाने पोलिसांत पीडिता हरवल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलीस तिचा शोध घेत त्या हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.