मंगळवेढ्यात सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपाच्याच

तालुक्यातील विविध गावांच्या 18 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकांमध्ये आ. समाधान आवताडे यांच्या गटाने तब्बल 9 ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा करण्यात आला. तालुक्यातील रहाटेवाडी या ग्रामपंचायतवर आ. आवताडे यांच्या गटाचे दत्तात्रय धसाडे यांची बिनविरोध निवड झाली. 16 ग्रामपंचायतचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये आमदार अवताडे यांच्या गटाला विनायक यादव(मारापूर), सारिका खिलारे (डोंगरगाव),बायडाबाई मदने (खोमनाळ),विमल चौगुले(गुंजेगाव),मैना देवकुळे (हाजापूर),काशीबाई बिराजदार (सोड्डी),श्रीकांत दवले (भालेवाडी), संजय पाटील(येड्राव) या ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापनेची समीकरणे आ. आवताडे यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. आमदारकी पदाची सूत्रे घेतल्यापासून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारचा गट - तट न पाहता केवळ सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे हा हेतू समोर ठेवून आपले कार्य सुरु ठेवले आहे.

मतदारसंघ कार्यक्षेत्रातील धोरणात्मक विकासाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील मूलभूत आणि पायाभूत सोयी - सुविधा मजबूत करण्यासाठी आ. आवताडे यांनी रस्ते, वीज, आरोग्य आदी बाबींकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देऊन ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचवण्यास जोर दिला आहे. तालुक्याच्या विविध भागातील रस्ते निर्मिती व सुधारणा यासाठी आ. आवताडे यांनी भरीव निधी पदरात पाडून अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्ते विकासाचा मार्ग मोकळा केला.आ. आवताडे यांच्या कार्याच्या या विधायक पद्धतीवर विश्वास टाकत तालुक्यातील जनतेने आपल्या मताचा कौल आ. आवताडे यांच्या बाजूने पुन्हा एकदा टाकला असल्याचा दावा करण्यात आला. तालुक्यातील जनतेने माझ्या कार्यनेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींवर लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांना आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तमाम जनतेस मी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आपण ज्या अपेक्षेने आमच्यावर विश्वास टाकला त्यास आम्ही आमच्या कामातून सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.

- आ. समाधान आवताडे.