वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे केले मोदींनी उद्घाटन; गृहप्रकल्पाचेही केले लोकार्पण

पिंपरी(पुणे); ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून मंगळवारी दुपारी शिवाजीनगर, पोलिस परेड मैदान येथे करण्यात आले. तसेच मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याबरोबरच बोर्‍हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांतील 1 हजार 288 लाभार्थ्यांना सदनिकेच्या चाव्या देण्यात आल्या.

डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यासाठी बोर्‍हाडेवाडी येथील 1 हजार 288 लाभार्थ्यांना पती आणि पत्नी असे जोडीने बोलाविण्यात आले. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. वेस्ट टू एनर्जी व डुडुळगाव गृहप्रकल्पाचे ऑनलाईन कळ दाबून अनुक्रमे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.

डुडुळगाव गृहप्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण होणार

डुडुळगाव येथील गृहप्रकल्पात एकूण 1 हजार 190 सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 188 कोटी 18 लाख खर्च अपेक्षित आहे. तेथे 15 मजली 5 इमारती बांधण्यात येणार आहेत. या कामाची मुदत अडीच वर्षे आहे.

बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पात 1 हजार 288 लाभार्थी

बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्प एकूण 1 हजार 288 सदनिका आहेत. त्या प्रकल्पासाठी पालिकेने एकूण 127 कोटी 70 लाखांचा खर्च केला आहे. सदनिकेचे चटई क्षेत्र 323 चौरस फुट आहे. तेथे 14 मजली 6 इमारती आहेत.