सोलापूर विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन विषयावर नेट-सेट कार्यशाळा

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाच्यावतीने दि. 21 मार्च 2023 रोजी वाणिज्य व व्यवस्थापन या विषयावर नेट व सेट स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

सोलापूर विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन विषयावर नेट-सेट कार्यशाळा

सोलापूर वृत्‍तसेवा : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाच्यावतीने दि. 21 मार्च 2023 रोजी वाणिज्य व व्यवस्थापन या विषयावर नेट व सेट स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेमध्ये डॉ. श्रीनिवास जगताप आणि डॉ. श्यामा काडादी हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय सोलापूर तसेच प्रा. चंदन ठेंगील, बी.एम.आय. टी महाविद्यालय सोलापूर हे तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करतील.

दरम्‍यान, या कार्यशाळे करिता वाणिज्य व व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या तसेच पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी व शिक्षकयांना याचा लाभ घेता येईल. सदर कार्यशाळेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 5 असून कार्यशाळेकरिता विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदनीकरिता श्रीकांत धारूरकर यांच्याशी संपर्क साधाण्याचे संकुलाकडून सांगण्यात माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यशाळे करिता सोलापूर शहर व परिसरातील विद्यार्थी व शिक्षकांना या कार्यशाळेला ऑनलाईनव्दारे उपस्‍थित रहावे, असे आवाहन वाणिज्य व्यवस्थापन संकुलाच्या समन्वयक डॉ. रश्मी दातार यांनी केलेले आहे.