फक्त विराटच नाही तर हे ५ खेळाडू आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा उडवणार धुव्वा, पाहा कोण आहेत या यादीत

India vs New Zealand 1st odi 2023: पाकिस्तानला पराभूत करून भारतात आलेल्या न्यूझीलंड संघ भारतासोबत लढतीसाठी आता सज्ज झाला आहे. तर रोहित शर्माची सेनाही श्रीलंकेच्या संघाला क्लीन स्वीप करत न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी तयार आहेत.

फक्त विराटच नाही तर हे ५ खेळाडू आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा उडवणार धुव्वा, पाहा कोण आहेत या यादीत

हैदराबाद: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून हैदराबादमध्ये सुरुवात होत आहे. श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करून टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेनंतर आता घरच्या भूमीवर आणखी एक मालिका क्लीन स्वीप करण्यावर टीम इंडियाची नजर असेल. मात्र, पाकिस्तानला पराभूत करून भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाचा उत्साहही उंचावला आहे. दोघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित असणार आहे. आजच्या सामन्यात या भारतीय खेळाडूंची जादू चालली तर न्यूझीलंड संघाला चांगलंच भारी पडणार आहे. रोहित फॉर्मात पण शतकाच्या प्रतीक्षेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने २०१९ मध्ये शेवटचे वनडे शतक झळकावले. सध्याच्या घडीला त्याचा चांगला फॉर्म आपल्याला वेळोवेळी दिसून येत आहे पण शतक झळकावण्यापासून तो अद्याप द्दुर राहिला आहे. वनडे क्रिकेटच्या दृष्टीने त्याचे शतक खूप महत्त्वाचे आहे.वाचा: कोहली भन्नाट फॉर्मात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गेल्या ४ डावात ३ शतके झळकावली आहेत. आता कोहली आपल्या जुन्या फॉर्मात दमदार परतला असून केवळ चौकारच नव्हे तर षटकारही मारताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध तो आपल्या बॅटने नक्कीच वादळी खेळी करेल अशी अपेक्षा आहे. ईशान किशनचा डबल धमाल यष्टिरक्षक इशान किशनने द्विशतक झळकावून बांगलादेशलामध्ये तुफान आणले होते. श्रीलंकेविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात यष्टिरक्षणची देकील जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे तसेच फिनिशरची भूमिकाही तो निभावताना दिसणार आहे.हेही वाचा: कुलदीपच्या फिरकीची जादू कसोटीनंतर वनडेत पुनरागमन करणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध चहलच्या जागी खेळताना दोन सामन्यांत ५ बळी घेतले. आता आजच्या पहिल्या वनडेत त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.वाचा: सिराजची तुफानी गोलंदाजी मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध त्याच्या तुफान गोलंदाजीने कोणत्याच फलंदाजाला टिकू दिले नाही. त्याने तीन सामन्यांत ९ बळी घेतले. आता हा सामना त्याच्या घरच्या मैदानावर होत असल्याने सिराज आपल्या झंझावाती चेंडूंनी पाहुण्यां संघाची पुन्हा एकदा परीक्षा घेताना दिसणार आहे.