Breaking : कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

अनेक राज्यांच्या पोलिसांना चकवा देणारा कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला लवकरच मुंबईत आणलं जाण्याची शक्यता आहे.

Breaking : कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे. गेल्या ७ वर्षांपासून हा अनिल जयसिंघानी हा फरार होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृत फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. जयसिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्याची मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनिक्षालाही अटक केलेली आहे. या सर्व प्रकरणावर मुंबई पोलिसांकडून दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.