सांगोला : शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा तांदूळ; घेरडीच्या सरपंचांकडून पोलखोल
सांगोला: शालेय पोषण आहारात प्लास्टिक सदृश तांदूळ आढळला. याबाबतची तक्रार सांगोला तालुक्यातील घेरडी येथील सरपंच सुरेखाताई पुकळे यांनी अन्न भेसळ विभागाकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी माझ्याकडे अद्याप काहीही माहिती आलेली नाही. याविषयी योग्य माहिती घेऊन चौकशी करु, असे अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुनील जिंतुरकर यांनी सांगितले. शालेय पोषण आहारात मुलांना देण्यात …

सांगोला : शालेय पोषण आहारात प्लास्टिक सदृश तांदूळ आढळला. याबाबतची तक्रार सांगोला तालुक्यातील घेरडी येथील सरपंच सुरेखाताई पुकळे यांनी अन्न भेसळ विभागाकडे केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी माझ्याकडे अद्याप काहीही माहिती आलेली नाही. याविषयी योग्य माहिती घेऊन चौकशी करु, असे अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुनील जिंतुरकर यांनी सांगितले.
शालेय पोषण आहारात मुलांना देण्यात येणार्या तांदळामध्ये प्लास्टिकच्या हुबेहूब तांदळाची भेसळ केली आहे. मात्र, हा तांदूळ प्लास्टिकचाच आहे का ? याबाबत अद्याप तपास झालेला नाही. याबाबत घेरडी येथील शाळेत सरपंच सुरेखाताई पुकळे यांनी तातडीची बैठक घेऊन, तांदूळ मुलांना देऊ नका. याची गुणवत्ता तपासा, असे संबंधित शिक्षकांना त्यांनी सांगितले.
दरम्यान, शाळेच्या केंद्रप्रमुखांनी सोलापूर येथील अन्नसुरक्षा अधिकार्यांशी संपर्क केला असता गुरुवारी याच तांदळाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येतील. त्यानंतर काय ते बघू असे सांगितले.
प्लास्टिक तांदळाचा विषय घेरडी गावापुरताच मर्यादित नसून सोलापूर जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या सर्वच शाळांमध्ये असा प्रकार झालेला असेल.
– सुरेखाताई पुकळे, सरपंच, घेरडी