नव्या आर्थिक वर्षात RBI चलनविषयक समितीची बैठक कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

RBI MPC Meeting 2023 Schedule: रिझव्‍‌र्ह बँकेच्या या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष आरबीआय गव्हर्नर असतात आणि मध्यवर्ती बँकेचे दोन प्रतिनिधी त्यात असतात. तसेच तीन बाह्य सदस्यही एमपीसीच्या बैठकीत उपस्थित असतात. केंद्रीय बँकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये चलनवाढीचा हवाला देत मुख्य बेंचमार्क पॉलिसी रेट २५ बेस पॉइंट्सने ६.५ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

नव्या आर्थिक वर्षात RBI चलनविषयक समितीची बैठक कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : पुढील आर्थिक वर्षात चलनविषयक धोरण समितीची बैठक कधी होईल याची तारीख रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केली आहे. देशाची केंद्रीय बँक एप्रिल २०२३ म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पुढील चलनविषयक धोरण समिती आढावा बैठक घेणार आहे. त्याचे पूर्ण वेळापत्रक जारी करताना आरबीआयने माहिती दिली की आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पुढील आर्थिक वर्षात सहा वेळा होणार आहे. त्यानुसार, पुढील आर्थिक वर्षात आरबीआयची द्विमासिक एमपीसी बैठक एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे.आर्थिक वर्ष २०२३-३४ ची पहिली MPC बैठक ३ ते ६ एप्रिल दरम्यान होणार असून आर्थिक तज्ज्ञांनुसार यंदा आरबीआय व्याजदरात वाढ करणार नाही. मात्र यूएस फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने आरबीआयवर दबाव निर्माण होऊन कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. लक्षात घ्या की भारतातील इतर व्याजदरांना नियंत्रित करणारे बेंचमार्क व्याजदर निश्चित करण्यासाठी समिती जबाबदार असते.

२०२३-३४ वर्षासाठी बैठकीच्या तारखा- ३, ५ आणि ६ एप्रिल २०२३- ६ ते ८ जून २०२३- ८ ते १० ऑगस्ट २०२३- ४ ते ६ ऑक्टोबर २०२३- ६ ते ८ डिसेंबर २०२३- ६ ते ८ फेब्रुवारी २०२४रिझव्‍‌र्ह बँकेच्या या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष आरबीआय गव्हर्नर असतात आणि मध्यवर्ती बँकेचे दोन प्रतिनिधी त्यात असतात. तसेच तीन बाह्य सदस्यही एमपीसीच्या बैठकीत उपस्थित असतात. आरबीआयच्या तीन दिवसीय बैठकीत हे पाच सदस्य मिळून आर्थिक आणि देशांतर्गत परिस्थितीचा आढावा घेतात. गव्हर्नर व्यतिरिक्त, पॅनेलवरील आरबीआय अधिकारी राजीव रंजन (कार्यकारी संचालक) आणि मायकेल देबब्रत पात्रा (डेप्युटी गव्हर्नर) आहेत.फेब्रुवारीच्या आरबीआय MPC बैठकीचा निकालफेब्रुवारी २०२३ मधील चलनवाढीचा हवाला देत रिझव्‍‌र्ह बँकेने प्रमुख बेंचमार्क धोरण दर २५ आधार अंकांनी ६.५% वाढवले. अशा प्रकारे गेल्या वर्षी मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा दरवाढ केली, ज्याने एकूण व्याजदरात २५० बेसिस पॉइंट्सवर पोहोचली. पुढील आर्थिक वर्षासाठी आरबीआयने ६.४% विकास दराचा अंदाज व्यक्त केला असून वित्त मंत्रालयाच्या ताज्या आर्थिक सर्वेक्षणात, २०२३-२४ साठी विकासाचा अंदाज ६ ते ६.८% होता.