राशी आणि रंग; जाणून घ्या राशीनुसार शुभ रंग
सोलापूर; अंबादास पोळ : रंगपंचमी हा एक सण फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी सामान्यतः लोकांना लाल, गुलाबी, केशरी, पिवळ्या रंगांनी होळी खेळायला आवडते.

सोलापूर; अंबादास पोळ : रंगपंचमी हा एक सण फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी सामान्यतः लोकांना लाल, गुलाबी, केशरी, पिवळ्या रंगांनी होळी खेळायला आवडते. राशीनुसार ठरवून दिलेल्या रंगांसोबत या रंगांचा वापर केल्यास जीवनात आनंदाचा वर्षाव होतो, असे ज्योतिष पुंडलिक माधवराव जोशी यांनी सांगितले. (Rang Panchami 2023)
बारा राशींचे भाग्यशाली रंग (Rang Panchami 2023)
- मेष (राशीचा स्वामी मंगळ) – लाल, गुलाबी आणि केशरी रंग
- वृषभ (राशीचा स्वामी शुक्र) – पांढरा आणि मलई रंग
- मिथुन (राशीचा स्वामी बुध) हिरवा आणि नीलमणी रंग.
- कर्क (राशीचा स्वामी मंगळ चंद्र)) – पांढरा आणि क्रोम रंग.
- सिंह (राशीचा स्वामी सूर्य) केशर, लाल आणि गुलाबी रंग
- कन्या (राशीचा स्वामी बुध- हिरवा आणि नीलमणी) हिरवा रंग.
- तूळ (राशीचा स्वामी शुक्र) पांढरा आणि हलका निळा रंग.
- वृश्चिक (राशीचा स्वामी मंगळ) – केशरी, लाल आणि गुलाबी रंग
- धनु (राशी स्वामी बृहस्पति) – पिवळा आणि सोनेरी रंग
- मकर आणि कुंभ (राशी स्वामी शनी) – तपकिरी, राखाडी आणि राखाडी रंग.
- मीन (राशी स्वामी बृहस्पति) – पिवळा आणि सोनेरी रंग.
या रंगांचा वापर होळीचा सण प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यासाठी केला पाहिजे. (Rang Panchami 2023)
राशीनुसार हे रंग टाळा….
- मेष- काळा, निळा आणि हिरवा
- वृषभ- हिरवा आणि लाल
- मिथुन- लाल, केशरी, पिवळा
- कर्क- हिरवा, काळा, निळा
- सिंह- निळा, काळा, हिरवा
- कन्या- पिवळा, लाल, केशरी
- तुला- हिरवा आणि पिवळा
- वृश्चिक- काळा, निळा, हिरवा
- धनु- हिरवा, काळा, निळा
- मकर- लाल, हिरवा, नारंगी
- कुंभ- नारंगी, लाल , हिरवा
- मीन – काळा, निळा, हिरवा
रंगपंचमी मध्ये नैसर्गिक रंगाला पसंती..
रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.
रंगपंचमीचे महत्व..
रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे. ती कालांतराने बदलत जाऊन पाण्यासोबत रंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी केली जाते.
अधिक वाचा :
- पुणे न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे ही मानसिक क्रुरता, पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर
- H3N2 Influenza : मास्क वापरा, निती आयोगाचे आवाहन; इन्फ्लूएंझाच्या संसर्गाने वाढवली चिंता
- अनिल परब यांना धक्का : दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना ‘ईडी’ कोठडी
The post राशी आणि रंग; जाणून घ्या राशीनुसार शुभ रंग appeared first on पुढारी.