रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य; वर्ल्डकप काही दिवसांवर आणि हिटमॅन असं का बोलला, फरक पडत नाही...
Rohit Sharma: एकदिवसीय विश्वचषकासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षी ही स्पर्धा भारतात होत असून संभाव्य विजेत्यांमध्ये भारतीय संघ देखील आहे.

नवी दिल्ली: आयसीसी वनडे ला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेतील संघ भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप खेळण्याची इच्छा नसलेला खेळाडू कोणी भेटणार नाही. चाहत्यांना देखील त्यांचे आवडत्या खेळाडूंना मैदानावर पाहण्याची इच्छा असते. वर्ल्डकपच्या आधी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे.अशाच भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने असे एक वक्तव्य केले आहे ज्याची चर्चा जोरदार सुरू आहे. भारतात २०११ साली अखेरचा वर्ल्डकप झाला होता, तेव्हा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. पण त्यानंतर भारताला एकदाही वनडे वर्ल्डकप जिंकता आला नाही. २०१५ आणि २०१९ ला भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. २०११नंतर टीम इंडिया वर्ल्डकप विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. यावर्षी भारतात वर्ल्डकप होत आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे. वर्ल्डकपला सुरूवात होण्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. अशा मोठ्या स्पर्धेत संपूर्ण संघ लयीत असने फार गरजेचे असते आणि भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. वर्ल्डकपच्या आधी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्या फॉर्मबद्दल काळजी व्यक्त केली जात होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्च्या मालिकेत दोघांनी दमदार फलंदाजी केली. अय्यरने १०५ धावांची शतकी खेळी केली तर सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ७२ धावा केल्या. गेल्या म्हणजे २०१९ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने ५ शतक झळकावली होती. आता रोहित संघाचा कर्णधार आहे. पण रोहितला वर्ल्डकपसाठी वैयक्तीक रेकॉर्ड फार महत्त्वाचे वाटत नाही. रोहितच्या मते त्याची वैयक्तीक कामगिरी कशीही झाली तरी हरकत नाही पण संघाचे एकच लक्ष्य आहे वर्ल्डकप जिंकायचे. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना रोहित म्हणाला, २०२३च्या वर्ल्डकपमध्ये मी एक शतक करो अथवा दोन शतक किंवा एकही शतक झाले नाही तरी चालेल. पण संघाचे एकच लक्ष्य आहे की वर्ल्डकप जिंकायचा. ते आमचे मुख्य लक्ष्य आहे. वर्ल्डकपमध्ये भारताची पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर ११ तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध लढत होईल. १४ तारखेला पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच होईल. स्पर्धा सुरू होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. यातील पहिली लढत इंग्लंडविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी तर दुसरा सराव सामना नेदलँडविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
What's Your Reaction?






