बीड : एसटी बस-मिनी बसचा अपघात; पंधरा भाविक जखमी

बीड, पुढारी वृत्तसेवा ः बीडहून पंढरपूरकडे निघालेल्या एसटी बसला पाठीमागून मिनी बसने जोराची धडक दिली. या अपघातात मिनी बसमधील १५ भाविक जखमी झाले असून त्यातील दोघांना गंभीर मार लागला. ही घटना शनिवारी च्या दरम्यान वाणगाव फाट्याजवळ घडली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील एक कुटुंब पंढरपूरला मिनी बस (एम.एच. 19 वाय 6102) यामध्ये जात होते. बीडपासून काही … The post बीड : एसटी बस-मिनी बसचा अपघात; पंधरा भाविक जखमी appeared first on पुढारी.

बीड : एसटी बस-मिनी बसचा अपघात; पंधरा भाविक जखमी

बीड वृत्तसेवा ः बीडहून पंढरपूरकडे निघालेल्या एसटी बसला पाठीमागून मिनी बसने जोराची धडक दिली. या अपघातात मिनी बसमधील १५ भाविक जखमी झाले असून त्यातील दोघांना गंभीर मार लागला. ही घटना शनिवारी च्या दरम्यान वाणगाव फाट्याजवळ घडली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील एक कुटुंब पंढरपूरला मिनी बस (एम.एच. 19 वाय 6102) यामध्ये जात होते. बीडपासून काही अंतरावर असलेल्या वाणगाव फाट्याजवळ ही मिनीबस बीडहून पंढरपूरकडे निघालेली एस.टी. बस (एम.एच. 14 बी.टी. 1929) ला पाठीमागून जोरात धडकली.

या अपघातात मनिषा भागवत कोंडी (वय ३०, रा. भुसावळ), आशाबाई सुखदेव कोंडी (५५), राजश्री किशोर कोंडी (१५), हेमंत बावीसकर (२७), यश भागवत कोंडी (१२), चंद्रभागा रघुनाथ कोंडी, कैलास बोधडे, राहुल एकनाथ कोंडी, अश्विनी संदीप सपकाळ, नर्मदा एकनाथ कोंडी यासह अन्य १५ जण जखमी झाले. यातील दोघांना गंभीर स्वरुपाचा मार लागला आहे. अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांना झाल्यानंतर पीएसआय घोडके, नागरगोजे, विलास ठोंबरे, मुंडे, संजय खताळ, अनिल तांदळे, मेहेत्रे, सुरवसे, सांगळे यांनी घटनास्थळी जावून रुग्णांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.