अधिक श्रावणातील शिवदर्शन : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नगरेश्वर मंदिर

बार्शी शहरातील मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या अगदी लगत असलेल्या व प्रभू श्रीराम मंदिरात श्री नगरेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री शिव मंदिर अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले मंदिर आहे. मंदिराची आख्यायिका? : साधारणतः दोनशे वर्षांपूर्वीचे हे बार्शी शहरातील एकमेव शिव पंचायतन पद्धतीचे शिवमंदिर आहे.

अधिक श्रावणातील शिवदर्शन : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नगरेश्वर मंदिर

बार्शी शहरातील मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या अगदी लगत असलेल्या व प्रभू श्रीराम मंदिरात श्री नगरेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री शिव मंदिर अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले मंदिर आहे.

मंदिराची आख्यायिका? : साधारणतः दोनशे वर्षांपूर्वीचे हे बार्शी शहरातील एकमेव शिव पंचायतन पद्धतीचे शिवमंदिर आहे. दुर्मीळ असलेल्या या मंदिरातच शिवपंचायतन असल्याचे दिसून येते. सखाराम महाराज यांनी अगदी खूप प्राचीन काळामध्ये या मंदिराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते.आज त्या मंदिरात त्यांची सातवी पिढी सेवा बजावत आहे. मंदिरामध्ये श्री महादेव, श्री गणपती, पार्वती, सूर्य,नारायण (विष्णू) यांच्या मूर्ती आहेत. अशा पद्धतीची दुर्मीळ मंदिरे अपवादानेच पाहायला मिळतात. नगरेश्वरांचे मंदिर हेमाडपंती स्वरूपाचे आहे. दहा बाय दहाचा गाभारा आहे, तर शिखर एकूण तीस फूट उंचीचे आहे. मंदिराच्या समोरील भागात जुन्या पद्धतीचा लाकडी भव्य दिव्य स्वरूपाचा सभा मंडप आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असून, मंदिराचे मुख मात्र पूर्व दिशेला आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या डाव्या बाजूला सखाराम महाराजांनी स्वतःच्या कोपराने तेथे पाण्यासाठी आड खोदला आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

मंदिरात साजरे होणारे महत्त्वाचे सण – उत्सव : महाशिवरात्री, श्री राम नवमी, श्री कृष्ण जन्माष्टमी या उत्सवाबरोबर श्रावण महिन्यात व अधिक मास महिन्यात संक्रांतीच्या दिवशी मोठे धार्मिक उत्सव पार पडतात.

मंदिराकडे कसे जाल

बार्शी बस स्थानकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर रिक्षाने जाण्याची सोय आहे.