सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा होणार कुस्तीची लढत, 'त्या' वादाला पूर्णविराम लागणार?

Maharastra Kesari Tournament: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्तीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच एक नवा निर्णय घेण्यात येत आहे. वाचा सविस्तर

सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा होणार कुस्तीची लढत, 'त्या' वादाला पूर्णविराम लागणार?

सांगली: महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडली. शिवराज राक्षेच्या रूपात महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरीदेखील मिळाला. पण या स्पर्धेतील एका कुस्तीच्या लढतीचा वाद अजूनही जोर धरून आहे. पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग यांच्यात झालेल्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्याने सिकंदर ही लढत जिंकण्यात अयशस्वी ठरला, अशी चर्चा वारंवार होतं आहे. आता या वडावर पडदा टाकण्यासाठी या दोघांमध्ये पुन्हा लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सुरू झालेल्या कुस्तीच्या वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीची अंबाबाई तालीम संस्था पुढे आली आहे. पैलवान सिकंदर आणि महेंद्र यांच्यात सांगलीमध्ये मातीतील कुस्ती आयोजित करण्यात येणार असल्याचे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद यांनी जाहीर केले आहे.महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात पार पडलेल्या कुस्तीमध्ये पराभव झालेल्या पैलवान सिकंदर शेख याने पराभवाबाबत केलेल्या आरोपानंतर कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर सोशल मीडियासह अन्यत्र पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या,यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.आता या वादावर पूर्णविराम लागावा आणि वाद थांबावा यासाठी सांगलीच्या मिरजेतील अंबाबाई तालीम संस्था पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा लढत लावण्याचा मानस असल्याचे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.याबाबत अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे म्हणाले, कुस्ती क्षेत्रांत सध्या जो वाद सुरू झाला आहे, तो योग्य नाही. हा वाद कुठे तरी थांबला पाहिजे. त्यामुळे पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात मिरजेत कुस्ती मैदान तयार करण्यात येणार आहे. मॅट ऐवजी लाल माती मध्ये पहिल्या नंबरसाठी ही कुस्ती पार पडेल.ज्यामध्ये त्यांचे कौशल्य समोर येईल,यासाठी पैलवान सिकंदर शेख यांच्याशी आपले बोलणे झाले असून या कुस्तीसाठी सिकंदर शेख याने तयारी दर्शवली आहे आणि पैलवान महेंद्र व त्याच्या वस्तादांशी बोलणी सुरू असून ते देखील या कुस्तीला होकार देतील आणि लवकरच सांगलीमध्ये ही कुस्तीची लढत होईल आणि सध्या सुरु असलेल्या वादावर तोडगा पडेल,असा विश्वास ही संजय भोकरे वस्ताद यांनी व्यक्त केला आहे.