सोलापूर : सुरत ते चेन्नई हरित महामार्गाच्या कामासही लवकरच सुरुवात

सोलापूर : जिल्ह्यातील रस्ते विकासामुळे राज्याच्या व देशाच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे. या सुधारणांमुळे दोन टक्के इतके सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढणार असल्याबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी मते मांडली आहेत. कुशल व अकुशल मनुष्य बळास रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. सुरत-चेन्नई हा सहापदरी महामार्गही केंद्राकडून मंजूर झाला आहे. अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या महामार्गाचे कामही लवकरच सुरू

सोलापूर : सुरत ते चेन्नई हरित महामार्गाच्या कामासही लवकरच सुरुवात

सोलापूर : जिल्ह्यातील रस्ते विकासामुळे राज्याच्या व देशाच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे. या सुधारणांमुळे दोन टक्के इतके सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढणार असल्याबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी मते मांडली आहेत. कुशल व अकुशल मनुष्य बळास रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. सुरत-चेन्नई हा सहापदरी महामार्गही केंद्राकडून मंजूर झाला आहे. अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या महामार्गाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

सुरत ते चेन्नई हा मार्ग अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (सोलापूर शहराला स्पेस कनेक्टिव्हिटिसहीत) हरित महामार्ग एकूण 239.33 कि.मी. लांबीचा असून, हा महामार्ग सहापदरी एक्सेस कंट्रोल आहे. हा महामार्ग केंद्रशासनाकडून मंजूर झालेला असून, डी. पी. आर.चे काम अंतिम टप्प्यात आहे. भूसंपादनाचे काम सुरू आहे. हा महामार्ग सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांमधूून जात आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेबाबत केंद्र शासनाकडून व रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या मंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले आहे. भूसंपादनाबाबत एका नियमावलीनुसार एसओपी करण्याचे काम चालू आहे. तसेच भविष्यात या एसओपीप्रमाणे भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे नियोजन आहे.

अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग क्र. 516 मधील 59 कि.मी.चा असून, हा महामार्ग सद्यस्थितीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूरकडे हस्तांतरण झाला आहे. सध्या महामार्गाचे डीपीआर पूर्ण झाल्यानंतर महामार्गाचे कामी हाती घेण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यामध्ये 917.41 कि.मी. इतकी राष्ट्रीय महामार्गाची लांबी येते. हे सर्व रस्ते पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्हा हा राज्यालाच नव्हे, तर देशाच्या नकाशावर दिमाखदार पध्दतीत झळकणार आहे.

ज्यामध्ये परिपूर्ण असे रस्त्याचे जाळे असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये दोन तासांमध्ये आपण कोणत्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचू शकतो. सोलापूर शहरापासून पुणे साडेतीन तासांत, हैद्राबाद चार तासांत, औरंगाबाद पाच तासांत, बेंगलोर व नागपूर दहा तासांत व मुंबई पाच ते सहा तासांत पोहोचू शकतो.