सोलापूर : वाहन खरेदीच्या वादातून सुरीने भोसकून मित्राचा खून

वाहन खरेदी व्यवहारातून झालेल्या वादातून मित्रानेच सुरीने पोटात भोसकून छातीवर वार करून मित्राचा खून (Solapur Crime News)  केला. ही घटना मंगळवारी (दि.१) रात्री आठच्या सुमारास सांगोला शहरातील धान्य बाजार पटांगणात घडली. नवाज अकबर खतीब (वय २७, रा. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सोलापूर : वाहन खरेदीच्या वादातून सुरीने भोसकून मित्राचा खून

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : वाहन खरेदी व्यवहारातून झालेल्या वादातून मित्रानेच सुरीने पोटात भोसकून छातीवर वार करून मित्राचा खून (Solapur Crime News)  केला. ही घटना मंगळवारी (दि.१) रात्री आठच्या सुमारास सांगोला शहरातील धान्य बाजार पटांगणात घडली. नवाज अकबर खतीब (वय २७, रा. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. उपचारादरम्यान सोलापुरात आज (दि. २) सकाळी सात वाजता त्या तरुणाचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवाज खतीब व तन्वीर पठाण दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही वाळूचा व्यवसाय करीत होते. तनवीर पठाण यांनी नवाज खतीबकडून टेम्पो खरेदी केला होता. व्यवहारात करताना नवाजने तनवीर यास सदर वाहनावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात त्या वाहनावर एक गुन्हा दाखल असल्यामुळे तनवीर नवाजवर चिडून होता. याच व्यवहारातून दोघांत मंगळवारी रात्री वाद (Solapur Crime News)  झाला.

या वादातून तनवीरने सुरीने नवाजच्या पोटात भोसकून छातीवर वार केल्याने तो जागेवरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. वडिलांनी नवाजला गंभीर अवस्थेत सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तातडीने पुढील उपचार करीता सोलापूरला घेऊन जाण्याचे सांगितले.

सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी ७ च्या सुमारास नवाज खतीब याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.