टाटांनी मारली बाजी! अपमान करणाऱ्या फोर्डवर आणखी एक उपकार करणार, नवीन वर्षात होणार मोठा फेरबदल

Tata Motors-Ford Deal: टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, १० जानेवारी २०२३ रोजी व्यवहार पूर्ण करजाण्याचा निर्णय घेतला आहे, या व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या पूर्व शर्तींच्या पूर्ततेसह, संबंधित सरकारी मान्यताही मिळाल्या आहेत. तसेच फोर्ड इंडिया प्लांटमधील पात्र कर्मचाऱ्यांना टाटा पॅसेंजरमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.

टाटांनी मारली बाजी! अपमान करणाऱ्या फोर्डवर आणखी एक उपकार करणार, नवीन वर्षात होणार मोठा फेरबदल

नवी दिल्ली: अमेरिकन दिग्गज फोर्ड मोटर्सने भारतातील आपला व्यापार गुंडाळला आहे. कंपनीने भारतातील आपला प्लांट टाटा मोटर्सला विकला असून टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, टाटा मोटर्सची उपकंपनी, १० जानेवारी २०२३ पर्यंत गुजरातमधील साणंद येथे असलेल्या फोर्ड मोटर्स प्लांटच्या हस्तांतरणासाठीचा करार पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात कंपनीने, तिची उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा गुजरातमधील साणंद प्लांट ७२५.७ कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. या प्लांटची वार्षिक क्षमता तीन लाख युनिट्स इतकी आहे, जी ४२०,००० युनिट्सपर्यंत वाढवली जाऊ शकते. टाटा सोबतच्या करारानुसार, फोर्ड इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना टाटा मोटर्समध्ये समान अटी व शर्तींवर नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. लक्षात घ्या की आणि फोर्ड यांच्यातील हा दुसरा करार आहे. यापूर्वी मार्च २००८ मध्ये टाटा मोटर्सने फोर्डकडून जग्वार लँड रोव्हर २.३ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते. २०११ मध्ये फोर्डने सुमारे ८,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून साणंदमध्ये एक उत्पादन कारखाना स्थापन केला होता. मात्र, सुमारे १० वर्षे भारतीय बाजारपेठेत २ बिलियन डॉलरचे नुकसान सहन केल्यानंतर फोर्डने शेवटी भारतातील व्यास गुंडाळण्याचा निर्णय घेला आणि नंतर सर्व कारचे उत्पादन देखील थांबले. आता टाटा मोटर्स आपल्या प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहने बनवणार आहे. कर्मचाऱ्यांची बदली होणार या प्लांटमध्ये ३ हजाराहून अधिक लोकांना प्रत्यक्ष तर सुमारे २० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार दिला जातो. टाटा आणि फोर्डच्या संपादन करारानुसार साणंद प्लांटमध्ये काम करणाऱ्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना टाटा मोटर्समध्ये हस्तांतरित केले जाईल. फोर्ड इंडियाचा साणंद प्लांट ३५० एकरमध्ये पसरला असून इंजिन निर्मितीचा कारखाना ११० एकरांवर पसरलेला आहे. या वर्षी मे महिन्यात टाटा मोटर्सला फोर्डच्या पॅसेंजर कार निर्मितीचा कारखाना ताब्यात घेण्यासाठी मंजुरी मिळाली. फोर्डने दाखवला हिसका फोर्ड मोटर्सचे अध्यक्ष बिल फोर्ड यांनी १९९९ मध्ये प्रतिष्ठित यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता. टाटा समूहाची इंडिका गाडी अपयशी ठरत असताना रतन टाटांनी ते फोर्डला विकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिल फोर्ड यांनी अमेरिकेत रतन टाटा यांना सांगितले की, जेव्हा पॅसेंजर गाड्या बनवण्याचा अनुभव नाही, तेव्हा ते त्यात का उतरले. तुमचा कार व्यवसाय विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत. फोर्ड यांके शब्द टाटांन जिव्हारी लागले आणि त्याच रात्री त्यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय मागे घेतला. यानंतर त्यांनी टाटा मोटर्सला मोठ्या उंचीवर नेले. तर आता फोर्डला भारतात प्रचंड तोटा होत असताना टाटा मोटर्सकडे सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार बनल्या. फोर्डहे दोन ब्रँड, जग्वार आणि लँड रोव्हर खराब स्थितीत होते, ज्यानंतर टाटा मोटर्सने फोर्डला विकत घेण्याची ऑफर दिली. या कराराच्या संदर्भात फोर्डची टीम मुंबईत आली आणि बिल फोर्डला "तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात" असे म्हणावे लागले.