तेलगी प्रकरणी जितेंद्र आव्‍हाडांचे सूचक ट्वीट, "तो अदृश्य हात कुणाचा ..."

ऑनलाईन डेस्‍क : अजित पवारांनी बंड केलं आणि राष्‍ट्रवादीमध्‍ये फूट पडली. अजित पवार उपमुख्‍यमंत्री झाले. त्‍यांच्‍याबरोबर राष्‍ट्रवादीतील ९ बड्या नेत्‍यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्‍ट्रवादीमध्‍ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्‍यातील आरोप-प्रत्‍यारोपाला उधाण आलं आहे.

तेलगी प्रकरणी जितेंद्र आव्‍हाडांचे सूचक ट्वीट, "तो अदृश्य हात कुणाचा ..."

ऑनलाईन डेस्‍क : अजित पवारांनी बंड केलं आणि राष्‍ट्रवादीमध्‍ये फूट पडली. अजित पवार उपमुख्‍यमंत्री झाले.
त्‍यांच्‍याबरोबर राष्‍ट्रवादीतील ९ बड्या नेत्‍यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्‍ट्रवादीमध्‍ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्‍यातील आरोप-प्रत्‍यारोपाला उधाण आलं आहे. आता शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी तेलगी प्रकरणी ( Telgi scam ) एक सूचक ट्वीट करत अजित पवार गटातील एका नेत्‍यावर अप्रत्‍यक्ष निशाणा साधला आहे.

Telgi scam : मला दिल्‍लीला बोलवून घेतलं…

जितेंद्र आव्‍हाड यांनी केलेल्‍या ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. या प्रकरणी सीबीआयने दोषारोपपत्र (चार्जशीट) तयार केले. हे दोषारोपपत्र कायदेशीर तपासणीसाठी ॲडिशनल ॲडव्‍होकेट जनरल अमरेंद्र शरण यांच्‍याकडे पाठविले गेले. त्‍यांचा दुसर्‍या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्‍यांनी मला दिल्‍लीला बोलवून घेतलं. दिल्‍लीला गेल्‍यानंतर त्‍यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. तेव्‍हा मी त्‍यांना याबाबत शरद पवार साहेब यांच्‍याशी चर्चा करा, असे सांगितले. यानंतर शरद पवार साहेब आणि त्‍यांच्‍यामध्‍ये चर्चा झाली.

Telgi scam : ओरिजनल चार्जशीटमधील ती नावे गळण्यात आली

त्‍यानंतर दोन महिन्‍यांनी तेलगी प्रकरणी चार्जशीट दाखल करण्‍यात आले. त्‍यानंतर जी ओरिजनल चार्जशीट होती ज्यामध्ये ती नावे होती ती सगळी वगळण्यात आली होती. यामधून आपल्‍याला जो अर्थ काढायचा आहे तो काढू घ्‍या. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला …. तो अदृश्य हात कुणाचा … समझने वाले को इशारा काफी होता है !!!!!!, असेही त्‍यांनी आपल्‍या ट्वीटमध्‍ये नमूद केले आहे.