घरी आल्यावर गप्प-गप्प होता मुलगा, मित्राला कारण विचारताच आई हादरली; ८ वर्षीय मुलासोबत घडलं भयंकर

Amravati Latest Crime News : राज्यात गुन्ह्यांच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. अशात आता अमरावतीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका अवघ्या ८ वर्षीय मुलासोबत एका ओळखीच्या तरुणाने भयंकर प्रकार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

घरी आल्यावर गप्प-गप्प होता मुलगा, मित्राला कारण विचारताच आई हादरली; ८ वर्षीय मुलासोबत घडलं भयंकर

अमरावती : अमरावती जिल्ह्यात सातत्याने महिलांना व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, अशातच लहान मुलेसुद्धा आता सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे. इथे एका आठ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. ही धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पंकज लोणावरे रा. बजरंगनगर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ८ वर्षीय मुलगा आपल्या काही मित्रांसह बजरंगनगर येथे खेळत होता. यावेळी पंकज हा त्याच्याजवळ आला. त्याने पीडित मुलाला मोबाइलवर गेम लावून दिला. पीडित मुलगा गेम खेळण्यात मग्न असल्यावर पंकजने पीडित मुलाच्या तोंडाला रुमाल लावत त्याला जबरीने आपल्या घरात नेले. त्यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. सदर घटनेनंतर पीडित मुलगा आपल्या घरी गेला. त्याच्यासोबत काही मित्रही होते. आईने त्याला काय झाले, अशी विचारणा केली. परंतु, तो काहीही बोलत नव्हता. त्याचवेळी पीडित मुलाच्या मित्राने त्याच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. सदर धक्कादायक प्रकाराबाबत कळताच पीडित मुलाच्या आईने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.