चौथा दिवस ठरणार भारतासाठी गेमचेंजर, नेमकं काय करावं लागेल जाणून घ्या...

IND vs AUS 4th Test Day 4 : कसोटीचा चौथा दिवस हा सामन्याचे रुप बदलू शकते. भारताकडे ही एक मोठी संधी असेल. कारण हा चौथा दिवस भारतासाठी किंगमेकर ठरणार आहे. पण चौथ्या दिवशी जर भारताला वरचढ व्हायचे असेल तर त्यांना एक गोष्ट करणे गरजेचे आहे. चौथ्या दिवशी भारताला नेमकं काय करावं लागेल जाणून घ्या...

चौथा दिवस ठरणार भारतासाठी गेमचेंजर, नेमकं काय करावं लागेल जाणून घ्या...

अहमदाबाद : भारतासाठी कसोटीचा चौथा दिवस हा किंगमेकर ठरू शकतो. कारण चौथ्या दिवशी सामन्याचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. पण हे समीकरण बदलण्यासाठी भारतीय संघाला चौथ्या दिवशी चांगलाच घाम गाळावा लागेल.चौथ्या दिवशीचे पहिले सत्र भारतासाठी महत्वाचे असेल. पहिल्या सत्रात काही वेळ वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण त्यानंतर मात्र खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असेल. त्यामुळे पहिल्या सत्रात कमी विकेट गमावता भारताला चांगल्या धावा जमवता येऊ शकतात. पहिल्या सत्रात भारतीय संघ किती धावा उभारतो आणि किती विकेट्स राखतो, याचा परीणाम सामन्यावर होईल.दुसऱ्या सत्रात भारताला आक्रमकपणे फलंदाजी करावी लागेल. पण या सत्रात त्याच्या हातात किती विकेट्स आहेत हे महत्वाचे असणार आहे. दुसऱ्या सत्रात भारताला धावांता वेग वाढवावा लागले आणि तरच त्यांना ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येच्या जवळ जाता येऊ शकते. जर दोन्ही सत्रांचा विचार केला तर भारताला ६० षटकांमध्ये जवळपास २०० ते २५० धावा जमवाव्या लागतील.

भारताने जर दोन्ही सत्रात मिळून या धावा केल्या तर एकतर त्यांना ऑस्ट्रेलियावर आघाडी मिळवता येऊशकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण करता येऊ शकते. ऑस्ट्रेलियाचा संघ जर चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात फलंदाजीला आला तर भारताला हा सामना जिंकण्याची चांगली संधी असेल. कारण जर अखेरच्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना लवकर बाद केले तर विजयाची संधी असेल. पण जर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या दिवशी फलंदाजीला आला नाही तर त्यांची विजयाची संधी कमी होऊ शकते. त्यामुळे भारतीय संघासाठी चौथ्या दिवसाची पहिली दोन्ही सत्रं फार महत्वाची असणार आहे. या दोन सत्रात भारतीय संघ किती धावा करतो यावर भारताचे आणि या सामन्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय संघ किती जलद गतीने धावा जमवतो, यावर या टीम सामन्याचे आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे भवितव्य अवलंबून असेल.