पापा, आय हेट यू! तुम्ही मला मुलगी मानलेच नाही, वडिलांना चिठ्ठी लिहून मुलीने संपविले जीवन
Papa I hate you :पालक पुन्हा पुन्हा रागावतात तेव्हा मुलं कधी कधी चुकीचे पाऊल उचलतात. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील धोराजी येथे अशीच एक घटना घडली आहे. येथे ११ वीच्या विद्यार्थिनीने तणावाला कंटाळून अखेर गळफास घेण्याचा निर्णय घेतला.

आय हेट यू पप्पा... आपल्या वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित इयत्ता ११ वीच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत केली. तिने आपल्या आत्महत्येला आपल्या वडिलांनाच दोषी धरले आहे. गुजरातमधील ही अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्येनंतर एक भावनिक सुसाईड नोट समोर आली आहे. राजकोटच्या धोराजी येथील वसतिगृहात राहून ही विद्यार्थिनी शिकत होती. सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने मृत्यूसाठी वडिलांना जबाबदार धरले आहे. 'आय हेट यू, पप्पा.... तुम्ही मला कधीच मुलगी मानलं नाही, माझ्या मृत्यूचं कारण तुम्हीच आहात.' या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.पंख्याला लटकून गळफास घेत केली आत्महत्या कुटियाना येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीचे दिव्या दोडिया असं नाव आहे.
दिव्या ही धोराजीच्या रॉयल स्कूलमध्ये शिकत होती. दिव्या विज्ञान शाखेतून इंटरमिजिएट करत होती. यामुळे ती शाळेच्याच वसतिगृहात राहायची. शुक्रवारी रात्री दिव्या वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर न आल्याने तिची खोली तपासण्यात आली. त्यावेळी दिव्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली. यामध्ये दिव्याने तिच्या वडिलांच्या नावाने काही ओळी लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. वडिलांचा राग बनले कारणआत्महत्या करण्यापूर्वी दिव्याने वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहून नंतर जीव दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तिने वसतीगृहात ३१८ क्रमांकाच्या खोलीतील पंख्याला गळफास लावून जीवन संपवले. सुसाईड नोटमध्ये दिव्याने लिहिले आहे की, 'पप्पा, माझ्या मृत्यूचे एकच कारण आहे आणि ते तुम्ही आहात. मी तुमचा खूप तिरस्कार करते, कारण तुम्ही मला कधीच आपली मुलगी मानली नाहीत. तुम्हाला फक्त आदेश कसे द्यायचे आणि रागवायचे कसे इतकेच माहित आहे.'आईची माफी मागितलीतिच्या सुसाईड नोटमध्ये दिव्याने तिच्या मृत्यूसाठी वडिलांना जबाबदार धरले असून, तिने तिच्या आईची मात्र माफी मागितली आहे. दिव्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 'जेव्हा केव्हा माझी तुला आठवण येईल तेव्हा मी तुझ्यासोबत असेन आई. मला माफ कर आई, मी एवढ्या टेन्शनमध्ये राहू शकत नाही. माझ्या आत्म्याला कधीही शांती मिळणार नाही.
मी माझ्या प्रत्येक अश्रूचा बदला घेईन.' दुपारी डॉक्टरांनी तपासणी केली होतीदिव्याने ज्या दिवशी पंख्याला गळफास लावून घेतला त्यादिवशी तिने तिला चक्कर आल्याची तक्रार केली होती, अशी माहिती वसतीगृहाच्या वॉर्डनने पोलिसांना दिली. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ.भावनेश पटेल यांच्याकडे चौकशी केली. वॉर्डनच्या म्हणण्यानुसार, सर्व मुली रात्री साडेसात वाजता जेवल्यानंतर ग्रुप स्टडीसाठी कॉमन हॉलमध्ये जातात. शुक्रवारी दिव्याची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा मी खोलीतच अभ्यास करीन असे ती म्हणाली होती. अभ्यास करून मुली कॉमन रूममधून परतेपर्यंत दिव्या पंख्याला लटकलेली होती, अशी माहिती वॉर्डनने दिली आहे.