सोलापूर : पैशाच्या वादातून पत्नीचा निर्घृण खून करत पतीनेही गमावला जीव

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा :  पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून करून पतीनेही जीव गमावल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. ही माढा तालुक्यातील व्होळे खुर्द येथे शनिवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. .या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोनाली प्रशांत ओहोळ (वय-३२) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.

Sep 26, 2023 - 17:01
Sep 26, 2023 - 17:03
 0
सोलापूर : पैशाच्या वादातून पत्नीचा निर्घृण खून करत पतीनेही गमावला जीव

टेंभुर्णी :  पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून करून पतीनेही जीव गमावल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. ही माढा तालुक्यातील व्होळे खुर्द येथे शनिवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. .या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोनाली प्रशांत ओहोळ (वय-३२) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर प्रशांत महादेव ओहोळ (वय-३४) असे जीव गमावलेल्या पतीचे नाव आहे.  याबाबत मयत सोनाली हिचा भाऊ आनंद कुमार ताकतोडे (वय-३४),रा.व्होळे खुर्द ता.माढा) याने फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, सुमारे १४ वर्षांपूर्वी सोनाली हिचे लग्न प्रशांत महादेव मोहोळ (वय-३४) रा.मोडनिंब याच्याबरोबर झाले होते. सोनाली हिला तेरा वर्षाचा मुलगा निलराज व दहा वर्षाची मुलगी अर्पिता आहे. मागील चार महिन्यापूर्वी मोडनिंब येथील यात्रेमध्ये मेव्हणा प्रशांत याने त्यांची आई सुनंदा व वडील महादेव ओहोळ यांना वीटभट्टीच्या पैशाच्या कारणावरून मारहाण केलेली होती. त्यामुळे ते तीन महिन्यापासून ते व्होळे खुर्द येथे शेजारी पत्राशेडमध्ये राहत होते. मेव्हण्याच्या वडिलांवर दवाखान्यात उपचार केल्याने त्यांचा खर्च म्हणून त्यांचे घरातील लोक दोन लाख रुपये मागत होते. त्यामुळे मेहुणे प्रशांत हे तणावाखाली होते.

या कारणाने त्यांच्या घरात पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. मागील दोन दिवसांपूर्वी प्रशांत यांनी त्यांची दोन्ही मुले मोडनिंब येथे सोडली होती. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ वा. बहिणीच्या घरी गेल्यावर दरवाजा आतून बंद असल्याने हाक मारून ही दरवाजा उघडण्यास बराच वेळ होत असल्याने व प्रतिसाद न आल्याने घराच्या दरवाजावर लाथ मारून घराचा दरवाजा तोडून आत गेलो. समोर पाहिले असता घरामध्ये बहीण ही एका अंगावर झोपलेली दिसली. हलवून ही उठली नाही. तीच्या गळ्यावर दाबल्याचा व्रण दिसून आला. तसेच तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते. या घटनेने खळबळ उडाली असून ऐन गौरी गणपती सणात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरून गेला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow