माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल हाती

सोलापूर : जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य निवडीसाठी मतदानाची मोजणी आज (दि. 20) संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे

माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल हाती

माळशिरस तालुक्यातील मतमोजणीस प्रारंभ झाला असून तीन ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पुरंदावडे ग्रामपंचायतमध्ये राणी बापू मोहिते या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. चौडेश्वरवाडी ग्रामपंचायतमध्ये अलका इंगवले देशमुख व चांदापूरी ग्रामपंचायतीमध्ये जयवंत सुळ हे सरपंच पदी विजयी झाले आहेत.
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणाला कामाला लागली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात शांतता अबाधित रहावी यासाठी विजयी मिरवणूक, रॅलीला पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली. त्यातच यंदा सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. पॅनेल प्रमुखांनी आपलेच पॅनेल निवडून येणार तसेच सरपंच आपल्याच गटाचा होणार, असा दावा केला आहे