एका गुणाने मुंबईचा थरारक विजय; मिळवले राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

Kabaddi News: नगर येथे झालेल्या ७०व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्यांनी नगरचा पराभव केला.

एका गुणाने मुंबईचा थरारक विजय; मिळवले राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

अहमदनगर: जिल्हा हौशी संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या ७०व्या आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. मुंबई शहराने नगरला ३२ विरुद्ध ३१ असे एका गुणाने हरवले. निलेश लंके व शिवसेना संपर्क प्रमुख सुनील शिंदे तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला चषक प्रदान करण्यात आला. नगर आणि मुंबई शहर दरम्यान झालेला अटीतटीचा अंतिम सामना २५-२५ असा बरोबरीत होता. रेड पॉईंट्स मध्ये मुंबई आणि नगरमध्ये १५ - १५ अशी बरोबरी होती, टॅकल पॉईंट्स मध्ये नगर १० गुण घेऊन पुढे होते. मुंबई शहराने नगरला दोनदा ऑल आउट करून नगरवर लोन चढवले होते. तरीदेखील हा सामना बरोबरीत होता. वाचा- त्यानंतर पंचानी दोन्ही संघाना ५ - ५ चढायाचा सामना खेळण्यास सांगितले. ४ चढायापर्यंत सामना बरोबरीत होता. पण नगरचा कप्तान शंकर गदईने मुंबईच्या ओंकारला यश्वस्वी टॅकल केले आणि सामना फिरला त्यावेळी नगर तीस आणि मुंबई शहर २८ असा गुणफलक होता. तेव्हा नगरने बोनस पॉईंट मिळवत एक गुण पटकावला. नगर ३० आणि मुंबई २८ असा स्कोर होत. नंतर पुन्हा सामना बरोबरीत आला. आणि गोल्डन रेड पर्यंत सामना गेला. त्यात टॉस जिंकून नगरने गोल्डन रेडचा अवसर निवडला. त्यात मात्र मुंबईने बाजी मारली. वाचा- ... वाडिया पार्क मैदानावर २७ जानेवारी ते ३० जानेवारी असा कबड्डीचा थरार नगरकर यांनी अनुभवला. स्पर्धा संपल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.