श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्याच्यानिमित्त विविध रंगीत फुलांची आरास

पंढरपूर : सुरेश गायकवाड :  नूतन मराठी वर्षारंभ गुढीपाडवाचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने श्रींच्या मंदिरात व सोळखांबी व सभामंडप येथे झेंडू , गुलाब, अस्तर, कण्हेरच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे 700 किलो पाना फुलांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे स्वरुप नयमरम्य दिसत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्याच्यानिमित्त विविध रंगीत फुलांची आरास

पंढरपूर :   नूतन मराठी वर्षारंभ गुढीपाडवाचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने श्रींच्या मंदिरात व सोळखांबी व सभामंडप येथे झेंडू , गुलाब, अस्तर, कण्हेरच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे 700 किलो पाना फुलांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे स्वरुप नयमरम्य दिसत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही आरास पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. आजपासून तुळशी पुजा व चंदन उटी पूजेला सुरुवात होत असल्याने एकूणच मंदिरातील वातावरण आनंदीमय झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते. मंदिरात सजावट करण्यासाठी भाविकही उत्सुक असतात.रांजणगाव पुणे येथील भाविक नानासाहेब दिनकरराव पाचनकर यांनी आरासचा व डेकोरेटर्सचा खर्च करत मोफत सेवा दिली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ही आकर्षक सजावट केली आहे.

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तर मंदिर समितीच्या संकेतस्थळावरुनही घरबसल्या भाविकांना सुंदर आरासीचे दर्शन मिळत आहे.

सजावटीसाठी वापरण्यात आलेली फुले-

  • शेवंती ४५० किलो
  • पिंक कन्हेर ४० किलो
  • अस्तर ४० किलो
  • झेंडू १०० किलो
  • गुलाब ५० गड्डी