IND vs AUS : टीम इंडियाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
ऑनलाईन डेस्क : वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज ( दि. १९ ) ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची कामगिरी सुमार झाली. भारतीय गोलंदाजही सामन्यात विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ५ विकेट घेत भारतीय संघाच्या डावाला सुरूंग लावला. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांना सोडले तर इतर फलंदाजांना धावांचा दुहेरी …

ऑनलाईन डेस्क : वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज ( दि. १९ ) ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची कामगिरी सुमार झाली. भारतीय गोलंदाजही सामन्यात विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ५ विकेट घेत भारतीय संघाच्या डावाला सुरूंग लावला. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांना सोडले तर इतर फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. या पराभवासह टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. (IND vs AUS)
नाणेफेक जिंकून सामन्यात फलंदाजी करताना टीम इंडिया मोठी धावसंख्या उभा करू शकली नाही. स्टार्कने घेतलेल्या चार विकेटमुळे भारतीय संघाचे पाच फलंदाज केवळ ४९ धावांमध्ये तंबूत परतले. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या कडव्या प्रतिकारामुळे टीम इंडियाने कशीबशी ११७ धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात मिचेल स्टार्क याने सर्वाधिक ५ बळी मिळवले. (IND vs AUS)
घरच्या मैदानावर दुसरी निच्चांकी धावसंख्या
सामन्यात टीम इंडियाच्या नावे घरच्या मैदानावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना वन-डे सामन्यात भारतीय संघाची ११७ ही दुसरी निच्चांकी धावसंख्या आहे. भारतीय संघाने वन-डे क्रिकेटमधील पहिल्या डावातील आपली सर्वात कमी धावसंख्या श्रीलंकेविरुद्ध २०१७ साली केली होती. त्यावेळी भारतीय संघ केवळ ११२ धावांवर गारद झाला होता. १९९० मध्ये श्रीलंकेविरुद्ध मडगाव वन-डेत भारतीय संघाने केवळ १३६ धावा केल्या होत्या, २००७ साली झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या सामन्यात भारताचा डाव १४८ धावांवर आटोपला होता.