माझ्या वडिलांनी ड्रीम गर्ल-२ पाहिला असता : आयुष्मान खुराना

ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने ड्रीम गर्ल २ द्वारे आपल्या करियरची सर्वात बेस्ट ओपनिंग घेतली आहे. तीन दिवसांत तब्बल ४०.७१ कोटींची भरघोस कमाई केली आहे. आयुष्मान त्याच्या आयुष्यातील या खास क्षणी त्याचे वडील पी. खुराना यांना मिस करत असून आणि त्याच्या वडिलांनी ड्रीम गर्ल २ पाहावी अशी इच्छा आहे!

आयुष्मान ड्रीम गर्ल २ च्या यशोगाथेबद्दल आयुष्मान म्हणतो, “माझ्या वडिलांनी हे अनुभवायला हवे होते. ड्रीम गर्ल हा त्यांचा आवडता चित्रपट होता. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कसा केला याचा त्यांना खूप अभिमान होता. मला आठवतंय तो चित्रपट पाहताना त्यांना अनावर झाले होते. हा चित्रपट धडाकेबाज यश मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. माझी इच्छा आहे की त्यांनी ड्रीम गर्ल २ देखील बघायला हवा होता .

तो पुढे म्हणतो, “मला माहित आहे की त्यांना ते आवडले असते आणि त्यांना पुन्हा मनापासून हसताना मला आवडले असते ते माझे सर्वात मोठे समर्थक होते. त्यांचा माझ्यावरील अतुलनीय विश्वासाने माला आज मी जो आहे असे बनवले आहे.”

आयुष्मान म्हणतो की, त्याचे वडील त्याचे सर्वात मोठे चिअर-लीडर होते आणि त्यांनी त्याला असा मनुष्य बनण्यास प्रवृत्त केले आणि तो आज आहे. तो म्हणतो, “मी कमी प्रवास केलेल्या मार्गावर गेलो कारण त्यांनी मला सांगितले की मी माझ्या नशिबाचा निर्माता आहे आणि मी नेहमी माझे मन जे सांगते ते केले पाहिजे. मला माहीत आहे की ते मला वरून आशीर्वाद देत असतील. त्यांचे प्रगल्भ शब्द माझ्या मनात नेहमी गुंजत राहतील ‘बेटा पब्लिक की नब्ज समझो’.